मुंबई: बहुमतापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानुसार ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील, मात्र स्पष्ट बोलायचे झाल्यास ते कमीत कमी बहुमत चाचणी होई पर्यंत तरी मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत. आजही भारतीय जनता पक्षातील नेत्यांच्या आत्मविश्वास नसल्याचं स्पष्ट जाणवत आहे.

विशेष म्हणजे आज जरी भारतीय जनता पक्ष ज्यांच्यावर भष्टाचाराचे आरोप करत होता त्यांचाच जयजयकार करून सत्तेत विराजमान होताना दिसत आहे. मात्र भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप केले त्यांनाच राष्ट्रवादीतून फोडून सत्तेची म्हणजे बहुमताची स्वप्नं रंगवताना दिसत आहे. मात्र याच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांवर आरोप करताना फडणवीस यांनी अनेकवेळा रोष व्यक्त करत ‘सोडणार नाही यांना भाजप’ असे अनेकवेळा ट्विट्स केले होते, जे आज चर्चेचा विषय बनत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना आम्ही सोडणार नाही; फडणवीसांची ती जुनी हास्यास्पद ट्विट्स