24 April 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

मुंबईतील आरे मेट्रो प्रकल्पावेळी दडपशाही करणारे भाजप नेते सत्ता जाताच मालाड कुरार मेट्रोवरून रस्त्यावर

MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, १७ जुलै | तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या निमित्ताने भाजपने मोठं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं होतं. हजारो तरुण, तरुणी, सेलिब्रिटी, आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरून फडणवीस सरकारच्या आरेतील मेट्रो प्रकल्पाला विरोध करत होती. मात्र त्यावेळी फडणवीस सरकारने पत्रकारांवर देखील दडपशाही केली होती आणि शेकडो तारूंना तुरुंगात पाठवून त्यांच्यावर गुन्हे लादले होते. लोकांच्या कोणत्याही मागण्यांना फडणवीस सरकारने ढुंकूनही पाहिलं नव्हतं. मात्र आज तेच भाजप नेते सत्ता गेल्यावर मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या विकास कामात आणि स्वतःची मतपेटी जपण्याच्या बहाण्याने रस्त्यावर उतरवून लोकांच्या मदतीचा कांगावा करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसााठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मालाड कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे

कोर्टात धाव घेणार:
आम्ही आंदोलन करणारच. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. असं असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. याच्याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असं त्यांनी सांगितलं. (

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MMRDA start action against Kurar Slum BJP MLA Atul Bhatkhalkar detained news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x