19 April 2024 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लवकरच शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार

MNS, NCP, Sharad Pawar, Sandeep Deshpande, Raj Thackeray, Amit Thackeray

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला असून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेण्याची वेळ आल्यास काय करावे यासाठी विरोधी गोटातही भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून आघाडीच्या बाजूनं झुकलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन देशपांडेंना शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते. परंतु शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी १८ हजार ६४७ च्या मताधिक्याने देशपांडेंना पराभूत केलं. संदीप देशपांडे ४२ हजार ६९० मतं मिळवत दुसऱ्या स्थानावर, तर काँग्रेस उमेदवार प्रविण नाईक तिसऱ्या क्रमांकावर होते. माहीममध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे विजयाचे गणित बिघडल्याचा दावा देशपांडेंनी केला.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीबाबत शरद पवार यांनी भेटीमध्ये माहिती घेतली. माहीममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभवाची कारणंही पवारांनी जाणून घेतली. माहिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थिती चांगली आहे, अशी माहिती पवारांपर्यंत पोहचली होती. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय मिळेल, अशी त्यांना आशा होती.

विधानसभा निडणुकींसंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये पवारांनी जनतेला भारतीय जनता पक्षाविरोधात मतदान करायचे असल्याचे मत व्यक्त केलं. “भारतीय जनता पक्षाविरोधात जनतेला मतदान करायचं असलं तरी विरोधी पक्षांची आघाडी अद्यापही विस्कळीत असल्याने अपेक्षित लक्ष्य गाठण्यात अपयश आले,” अशी खंत पवारांनी देशपांडेसमोर बोलून दाखवली. तसेच “पुढील काळात सर्व विरोधी पक्षांना एकजूट दाखवावी लागेल,” असंही पवार देशपांडे यांना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x