25 April 2024 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, शिवसेनेचं चिन्हं तात्पुरतं गोठवलं जाण्याच्या शक्यतेने शिंदे पराभवाला घाबरून भाजपसाठी जागा सोडणार?

Mumbai Andheri East

Mumbai Andheri East Assembly By Poll Election | मुंबईतील शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेवरील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. इथे 3 नोव्हेंबरला मतदान आणि 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जाहीर झालेली ही पहिलीच चिन्हावरील निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईत आता शिवसेनेच्या चिन्हाचे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

रमेश लटके यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना पराभूत करून विधानसभेत पाऊल ठेवले होते. त्यानंतर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव केला होता. रमेश लटके बराच काळ मुंबई महापालिकेत नगरसेवकही होते. शिंदे गटाकडून वारंवार आपणच ओरिजिनिल शिवसेना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून शिंदे गट या जागेवर दावा करून ती लढवणार की भाजप शिंदे गटाकडून ही जागा हिसकावून घेणार यावर सर्वांची चर्चा सुरु झाली आहे.

या पोटनिवडणुकीत निवडणूक आयोग धनुष्यबाणाचं चिन्हं कुणाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाने निवडणूक लढवल्यास हे चिन्हं शिंदे गटाला मिळणार की शिवसेनेला याचीही उत्सुकता लागली आहे. भाजपनेही ही निवडणूक लढल्यास धनुष्यबाणाचं चिन्हं निवडणूक आयोग शिवसेनेला देणार का? सध्या निवडणूक आयोगाकडे चिन्हाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे हे चिन्हं कुणाला मिळणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, कायदेतज्ज्ञांच्या मते शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं निवडणूक आयोग तात्पुरत्या स्वरूपात गोठवलं जाऊ शकतं असं म्हटलं आहे. कारण यावर केंद्रीय निवडणूक आयोगात निर्णय प्रलंबित आहे. तसेच या महिन्यात अनेक सुट्ट्या असल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेवर सुद्धा प्रश्न चिन्हं आहे. तसेच ही प्रक्रिया थोडी वेळकाढू असल्याने यावर तडकाफडकी निर्णय होणार नाही असं कायदेतज्ञांनी म्हटलं आहे. मात्र दोन्ही बाजूने दावा केल्याने निवडणूक आयोग हे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात गोठवु शकतं अशी शक्यता आहे. तसे झाल्यास शिंदे गट नक्कीच ही जागा भाजपला सोडेल आणि तसं आधीच अघोषीतपणे ठरल्याचं स्थानिक नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे पाहिल्यास निवडणुकीत शिंदेंच्या वाट्याला पराभव वाट्याला असल्यास त्याचा संदेश संपूर्ण राज्यात जाईल याची भीती सुद्धा शिंदेंना असल्याने त्यांना ही जागा भाजपाला सोडण्याशिवाय गत्यंतर नाही, तसेच येथे शिंदे गटाकडे लढत देईल असा उमेदवार किंवा समर्थक नसल्याने शिंदे याविषयावर शांत आहेत असं म्हटलं जातंय.

कारण मतदान आणि मतमोजणी नोव्हेंबरमध्ये होणार असली तरी प्रचार महिनाभर आधी सुरु होणार आहे. त्यामुळे प्रचारात शिवसेनेकडून किंवा भाजप-शिंदे गटाच्या युतीकडून धनुष्यबाण कोण वापरणार हे गुंतागुंतीचं ठरू शकतं. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Andheri East by poll election declared check details 03 October 2022.

हॅशटॅग्स

#Mumbai Andheri East(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x