25 April 2024 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत कोरोनाने मृत्यू

Covid 19, Dr. Chittaranjan Bhave, Raheja Hospital

मुंबई, २ जून: जगभरातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात गेल्या २४ तासांत तब्बल ८,१७१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांचा संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. तर २४ तासांत २०४ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ५९८ इतकी झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९५ हजार ५२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ९७ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकूणच देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. आता मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील जीएसएमसी हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा कोरोनाने मृत्यू झालाय. डॉक्टर चित्तरंजन भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. एका कोरोनाग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती आहे.

मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान भावे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. रहेजा हॉस्पिटलमध्येच त्यांनी एका करोनाग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच ते स्वतः गाडी चालवत रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाले होते. त्यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन व्हावं लागलं. चित्तरंजन यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर, डॉक्टर चित्तरंजन यांच्या मृत्यूने मुंबईतील डॉक्टरांनी शोक व्यक्त केला आहे. मात्र त्यांच्याबाबतीत अनेक चिकीची माहिती प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

 

News English Summary: The number of deaths due to corona virus is increasing day by day in the country. Now, shocking information has come to light that a specialist doctor in Mumbai has died due to corona virus. Dr. Chittaranjan Bhave, a surgeon and specialist at GSMC Hospital in Mumbai, has died of coronary heart disease. Dr. Chittaranjan Bhave was an ear-nose-throat specialist.

News English Title: Mumbai based Doctor Chittaranjan Bhave dies of Covid 19 in Mumbai Raheja Hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x