24 April 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

'या' वेळेत खुली राहणार मुंबईतील दुकानं; बीएमसीची सुधारीत नियमावली

Mumbai BMC, Lockdown, Unlock, Covid 19, Guidelines

मुंबई, ९ जून : मागील अडीच महिन्यापासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनंतर अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. मुंबईतील लॉकडाउनबाबत पालिकेकडून आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

मिशन बिगेन अगेन म्हणत राज्य सरकारने लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी २ जून रोजी नियामवली प्रसिद्ध केली होती. याच नियमावलीनुसार मुंबई महापालिकेकडून सुधारीत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधारीत पत्रकानुसार, मुंबईतील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, एका दिवसात एकाच लेनची दुकानं उघडता येणार आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत दुकानं उघडता येतील, रविवारी दुकानं बंद ठेवावी लागणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एक सुधारित नियमावली जारी केली आहे. यामध्ये सर्व मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानं पूर्ण वेळ उघडता येणार असल्याचं नमूद केलं आहे. मात्र, यात मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सुरू करण्यास अजूनही परवानगी देण्यात आली नाहीये. मुंबई महापालिकेनं काही अटींचा उल्लेखही केला आहे.

सम- विषम या तत्वावर दुकानं सुरू ठेवण्याचा नियम पालिकेनं कायम ठेवला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी तर दुसऱ्या बाजुची दुकानं दुसऱ्या दिशी सुरू राहतील. तसंच, दुकानदारांनी सोशल डिस्टनसिंग व वाहतूकीची व्यवस्था करावी अशा सूचना पालिकेनं केल्या आहेत. ओपन एअर जिम, गार्डनमधील उपकरणं, बार यांसाठी परवानगी नसल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

मुंबई पालिकेच्या सुधारीत पत्रकातील प्रमुख मुद्दे;

  • खेळाच्या मैदानांवरील झुला किवा इतर खेळाच्या साहित्याचा वापर करता येणार नाही, ओपन एअर जिमच्या साहित्याचा वापरावर निर्बंध
  • दुकानं उघडली जातील, पण रस्त्याच्या एका बाजूची दुकान उघडी ठेवली तर दुसऱ्या बाजूकडील दुकानं बंद ठेवली जावी
  • दुकाने पूर्णवेळ(साधारणपणे जितका वेळ असतात) उघडी राहतील
  • दुकाने सोमवार ते शनिवार उघडी राहणार तर रविवारी बंद राहतील
  • वृत्तपत्रांची घरी डिलिव्हरी करण्यासाठी मुभा, पण मास्क आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांच पालन करावे लागेल
  • शैक्षणिक संस्था जसे कॉलेज, विद्यापीठ, शाळामधील कर्मचारी वर्ग आणि शिक्षकांना कामावर जाता येईल पण शिकवण्याच्या कामाव्यरिक्त इतर कामांसाठी
  • मुंबईच्या उपनगरातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ये जा करणाऱ्या मजूर, नोकरदारांना कोणत्याही परवानगी आवश्यकता भासणार नाही.

 

News English Summary: Mumbai, which has been stalled for the last two and a half months due to lockdown, is slowly recovering in the fifth phase of the lockdown. A number of conditions have been relaxed following the suggestion of the Central and State Governments. The municipality has relaxed more conditions regarding lockdown in Mumbai.

News English Title: Mumbai municipality has relaxed more conditions regarding lockdown in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x