18 July 2019 11:22 PM
अँप डाउनलोड

विधानसभेसाठी आता शरद पवारचं मैदानात, मुंबईत महत्वाची बैठक

विधानसभेसाठी आता शरद पवारचं मैदानात, मुंबईत महत्वाची बैठक

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याने एनसीपीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, लोकसभेतील पराभव झटकून टाकत नव्या दमाने कामाला सुरुवात करण्यासाठी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीत मराठवाडा विभागात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रनंतर मराठवाड्यात एनसीपीएला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, परंतु तरी देखील लोकससभा निवडणुकीत मराठवाड्यात पक्षाला यश आले नाही. बीड, उस्मानाबाद, परभणी मतदारसंघात पक्षाची ताकद असताना देखील यश मिळवता आलं नाही. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षातील अंतर्गत कलहावर टीका करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे एनसीपी’ला यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#NCP(125)#Sharad Pawar(125)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या