13 December 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

आज मुंबईतील पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता

MNS, Maharashtra Navnirman Sena, Assembly Election 2019, Raj Thackeray, Amit Thackeray

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार की निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यावर येत्या सोमवारी खास ठाकरी शैलीत उत्तर मिळण्याची शक्यता आहे,. येत्या सोमवारी अर्थात ५ ऑगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना इव्हेंटरूपी राजकारण स्वीकारून संवाद यात्रा काढून विधानसभेसाठी पोषक वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे या कॉर्पोरेट राजकारणाचा स्वीकार करणार का, ते देखील पाहण महत्वाचं ठरणार आहे. तसेच पक्ष राज्यातील एकूण किती जागा लढवणार आणि कोणाशी युती करणार किंवा नाही ते देखील महत्वाचं ठरणार आहे. एकाबाजूला काँग्रेस राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष लोकसभेनंतर झालेल्या पक्ष फुटीमुळे करजोर झाले असून मनसेला विरोधकांची जागा घेण्याची मोठी संधी आहे.

आगामी निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्यावी असा मनसेचा आग्रह आहे आणि त्यासाठी पक्षाने लढा उभारण्याचे ठरले आहे. तरी देखील ईव्हीएम शिवाय विधानसभा निवडणूक होतील अशी शक्यता जवळपास कमी आहे. त्यामुळे एकाबाजूला ईव्हीएम विरोधी लढा उभारताना दुसऱ्याबाजूला प्रचार आणि पक्षविस्तार सुरु ठेवण्याची भूमिका घेतली जाऊ शकते.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लोकसभा जिंकल्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रमुख विरोधी पक्षांनी ईव्हिएम मशिनच्या विरोधात भूमिका घेतली असून राज ठाकरे यांनी देखिल या आंदोलनात उडी घेतली आहे. यासाठी त्यांनी दिल्ली येथे मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेतली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखिल भेट घेवून ईव्हीएम विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर हा मेळावा मात्वाचा असणार आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेला कॉंग्रेस, एनसीपी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनासह अन्य पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत ईव्हीएम विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या २१ ऑगस्ट रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले असून त्याचे नेतृत्व राज ठाकरे आणि अन्य पक्षांचे नेते करणार आहेत. तेव्हा राज ठाकरे या मोर्चासंदर्भात महाराष्ट्र सैनिकांना काय आदेश देणार याकडे राज्ज्याचे लक्ष लागले आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x