19 April 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ; आंदोलन छेडण्याची तयारी

farmers loan waiver Maharashtra

मुंबई: मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपानं शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा गंभीर आरोप केला.

आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिला सुरक्षेचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. ”राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र या कर्जमाफीचा लाभ यावर्षी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. सरकारने जाहीर केलेली ही कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावी कधीपर्यंत होईल, याची तारीख सरकारने सांगावी,” असे फडणवीस म्हणाले.

भारतीय जनता पक्षातर्फे आज महाविकास आघाडी सरकारविरोधात पहिल्यांदाच राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन पुकारणार आहेत. आज भाजपकडून राज्यभरातील ४०० ठिकाणी आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील तहसील कार्यालयांसमोर हे आंदोलन केलं जाणार आहे.

 

News English Summery: Opposition Leader Devendra Fadnavis raised the issue of farmers’ debt waiver and women’s safety in the House when the assembly began functioning. “The state government has declared a loan waiver to the farmers. However, this loan waiver will not benefit the farmers affected by premature rains and heavy rainfall this year. This debt waiver announced by the government is fraudulent. The government should tell the date of execution of the entire loan waiver, ”Fadnavis said.

 

Web Title: Story BJP Party criticize government over farmers loan waiver Maharashtra Vidhan Sabha session 2020.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x