15 December 2024 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; लागण झालेल्यांची संख्या २६ वर

Corona Virus, Maharashtra Patients, Health Minister Rajesh Tope, News Latest Updates

मुंबई, १४ मार्च :  राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (COVID-१९) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या २६ वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.

नागपूर येथे एका ४३ वर्षीय आयटी व्यावसायिकाला कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. हा रुग्ण अमेरिकेचा दौरा करुन आलेला आहे. तर यवतमाळ येथे आढळून आलेले दोन्ही रुग्ण हे दुबईला जाऊन आले होते. या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकार एम डी सिंग यांनी सांगितल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

राज्यात पुढील आदेश येईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २६ इतकी झाली आहे. पुणे-पिंपरी चिंचवड-१०, मुंबई-५, नागपूर-४, यवतमाळ-२, ठाणे-१, कामोठे (रायगड)-१, नवी मुंबई-१, कल्याण-१ आणि अहमदनगर-१ या जिल्ह्यात मिळून २६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील सर्व १० रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

 

News English Summery: The number of corona virus affected (covid-19) in the state has increased. Now Maharashtra has the highest corona virus patients in the country. In Mumbai, Navi Mumbai and Yavatmal, the number of patients in the state has reached 26 as new patients are found. All schools have been closed as a precautionary measure in the context of Corona. This includes all public and private schools in the state. Health Minister Rajesh Tope said in the Legislative Assembly that all schools in the state would be closed by March 31. A 43-year-old IT businessman has been infected with Corona virus in Nagpur. This patient has visited the US. Both the patients found at Yavatmal had come to Dubai. Yavatmal District MD Singh has said that the report of the duo was positive.

 

News English Title: Story Corona Virus in Maharashtra there are 26 positive patients in the state says health Minister Rajesh Tope News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x