24 April 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल
x

चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही: शिवसेना

Story Shivsena, BJP State President Chandrakant Patil, CM Uddhav Thackeray, MP Sanjay Raut, Saamana Newspaper

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी आम्हाला काही प्रदर्शन करण्याची गरज नाही. आमची छाती फाडली तर त्यात रामच दिसेल असं ते म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेने पलटवार केलाय. ‘सामना’च्या अग्रलेखातून पाटील यांचा ठाकरे शैलीत समाचार घेण्यात आलाय.

शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरे ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे,सगळ्यांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म असतो. त्या राजधर्माचे पालन श्रीरामाने केले. तोच राजधर्म महाराष्ट्रात चालवला जात आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत. काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही. त्यामुळे विरोधक बेजार झाले आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारी ते छात्या बडवीत आहेत, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

काय म्हटलं आहे सामानात;
शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही.’ या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळय़ांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळय़ांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे ‘रामायण’ समजले असे होत नाही. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल,” असा सल्ला शिवसेनेनं भाजपाला दिला आहे.

 

News English Title: BJP state president Chandrakant Patil has been reported by Shiv Sena, saying that our chest will be torn but our chest will appear. State BJP president Chandamia Patil is raising his umbrella after Uddhav Thackeray’s Ayodhya. But, if your chest is really rammed, stop breastfeeding. Otherwise, Shri Sena’s mouthpiece ‘match’ is said to have hurt Sriram. Shiv Sena’s Hindutva is the real hypocrisy. Likewise, the BJP leaders in the state are pretending to be hypocrites. Uddhav Thackeray formed government with Congress or NCP. Though the ideologies of the parties in the government may be different, the religion of humanity is the religion of humanity. Shri Rama obeyed that dharma. The same religion is being run in Maharashtra. Uddhav Thackeray is as strong as Hindutva. Despite being with the Congress, he did not let salt stand in the milk of Hindutva. The Shiv Sena has criticized the opposition for making it useless.

 

Web News Title: Story Shivsena criticized BJP State President Chandrakant Patil on CM Uddhav Thackerays Ayodhya visit.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x