ज्यांचा भाजपने बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये: गुलाबराव पाटील

मुंबई: राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या ११ दिवसांत कोसळले, असं भाकित भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसात कोसळेल, असं भाकीत नारायण राणे यांनी केलं होतं. मात्र यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
नारायण राणे भविष्यकार आहेत का असा सवाल उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. तसचे स्वत:चं भविष्य ते बनवू शकले नाहीत आणि दुसऱ्याचं काय सांगणार असं गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचं काम जोरात सुरू असून ज्यांना भाजपने बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंच्या खरपूस समाचार घेतला आहे.
”शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळी केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली आहे. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्ताधारी तयार करत आहेत,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला. मात्र भविष्यात उद्धव ठाकरे भाजपासोबत आल्यास त्याला विरोध करणार का? अशी विचारणा केली असता नारायण राणे यांनी जो पक्षाचा निर्णय असेल. तोच आपला निर्णय असेल असे सांगितले होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आजपासून पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जातं आहे. राज्याची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होईल. तर सीएएविरोधातील आंदोलनं, एल्गार प्रकरणाचा तपास, कोरेगाव-भीमा या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंकडील सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याची चर्चा आहे.
News English Summery: Gulabrao Patil has criticized Narayan Rane, raising the question of whether Narayan Rane is a future leader. Talking to the media, Gulabrao Patil said that he could not make his own fate and what would anyone else say. Similarly, the work of the Alliance for Development is in full swing and those who made BJP goats should not do eleven things, said Gulabrao Patil.
Web Title: Story Shivsena leader Gulabrao Patil has criticized BJP MP and Former CM Narayan Rane.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL