11 December 2024 8:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

नियमानुसार महत्वाच्या कागदपत्रांवर खरं नाव लिहितात | मग मुलाने निकाह नामावर 'ज्ञानेश्वर' ऐवजी 'दाऊद' का लिहिलं?

Sameer Wankhede

मुंबई, 27 ऑक्टोबर | मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे बनावट होतं असा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंविरोधात आरपारची लढाई लढत आहेत. ‘समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र जोडून केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवली आहे. त्यामुळे मी ट्विटरवर त्यांच्यासंबंधी जे कागदपत्र शेअर केले आहेत ते जर खोटे निघाले तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल, एवढंच नव्हे तर मी राजकारण देखील सोडून देईल.’ असं वक्तव्य नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

समीर वानखेडेंचा जन्माचा दाखला जो मी ट्विटरवर शेअर केला आहे तो जर खोटा ठरला तर मी राजकारणातून बाहेर जाईल, राजीनामा देईल. पण जर ते कागदपत्र खरे असतील तर समीर वानखेडेने किमान समोर येऊन क्षमा मागितली पाहिजे की, आमच्या कुटुंबीयांचा जो दावा आहे तो खोटा आहे. क्षमा मागितली तरीही पुरेसं आहे. मी राजीनामा द्या असं सांगत नाही. कायद्यानुसार त्यांची नोकरी तर जाणारच आहे.’

कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रियेत भिन्नता आणि शंका वाढवणारी:
समीर वानखेडे यांनी प्रसार माध्यमांना यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “हो, मी मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं कारण माझ्या आईची तशी इच्छा होती. माझी आई जन्मानं मुस्लिम होती आणि तिनं माझ्या वडलांशी लग्न करून हिंदू धर्म स्वीकारला होता. मी सेक्युलर व्यक्ती आहे. मी ईदही साजरी करतो आणि दिवाळीही साजरी करतो. मी मंदिरातही जातो आणि मशिदीतही जातो. मी आईच्या इच्छेनुसार, मुस्लिम धर्माच्या रितीप्रमाणे लग्न केल्यानंतर स्पेशल मॅरेज एक्टप्रमाणे लग्न रजिस्टर केलं आहे. म्हणून हा काही गुन्हा झाला का?” पुढे बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, “माझ्याविरोधात केले जात असलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. मी धर्म बदलला आहे का? मी जन्माने हिंदू होतो आणि आताही हिंदू आहे. मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानं मी मुस्लिम होतो का?”

समीर वानखेडेंचे वडील काय म्हणाले:
नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

मुलगा आणि वडिलांच्या वक्तव्यात ते फसल्यात जमा:
समीर वानखेडेंच्या वरील प्रतिक्रियेत त्यांनी एकतर हे मान्य केलं की पहिल्या पत्नीशी लग्न मुस्लिम धर्माच्या प्रथेनुसार पार पडलं आणि स्पेशल मॅरेज एक्टप्रमाणे लग्न रजिस्टर केलं. दुसरीकडे वडील याच विषयावर म्हणाले, “मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली”. आता ते जरी काही क्षणांसाठी खरं मानलं तरी निकाह नामावर नावासहित स्वाक्षरी करताना समीर वानखेडे यांनी ‘हिंदू’ वडिलांच ‘ज्ञानेश्वर’ नाव न लिहिता त्यावर नातेवाईक आणि अनेक लोकं ‘दाऊद’ हे प्रेमाने हाक मारत असलेलं नाव का बरं लिहिलं? का समीर वानखेडे सुद्धा वडिलांना ‘ज्ञानेश्वर’ ऐवजी ‘दाऊद’ या नावानेच ओळखत असावेत अशी चर्चा सुरु झाली आहे. थोडक्यात वानखेडे कुटुंबीय जेवढ्या अधिक पत्रकार परिषद घेतील तेवढे ते खोलात अडकतील असंच प्रथम दर्शनी दिसतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Why Sameer Wankhede wrote fathers’ name as Dawood instead of Dnyaneshwar.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x