24 June 2019 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
x

वरळी की शिवडी विधानसभा? आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?

वरळी की शिवडी विधानसभा? आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?

मुंबई : मागील काही दिवसांपासून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्ष ते अधिकृतपणे शिवसेनेमध्ये कोणीही बोलण्यास तयार नाही. परंतु आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आहे. त्यासाठी वरळी किंवा शिवडी विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यासाठी अंतर्गत चाचपणी सुरु आहेत.

दरम्यान आदित्य ठाकरे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेतच, परंतु त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास अधिक उत्सुकता दाखवली होती असं शिवसेनेतील नेत्यांनी नाव ना सांगण्याच्या अटीवर भाष्य केलं आहे. दरम्यान, “आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण आदित्य ठाकरेंनी इतक्यात लोकसभा लढवू नये असा सल्ला शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना विचाराअंती दिला होता. विशेष म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे यांची देखील तीच इच्छा होती. मात्र स्वतः आदित्य ठाकरे त्यावेळी लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम होते.

मात्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना विधानसभा लढविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अखेर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला मनावर घेतला आणि त्यांच्यासाठी शिवसेनेकडून विधानसभा मतदार संघाचा शोध सुरु झाला असं समजतं. त्यावेळी प्राथमिक निष्कर्षानंतर हायप्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघ आणि त्याबाजूचा शिवडी विधानसभा मतदारसंघ असे २ मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रसार माध्यमांना नाव न सांगण्याच्या अटीवर देण्यात आली. मात्र शिवडीच्या सध्या शिवसेनेचे आमदार असले तरी २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेला फायदा झाला होता. दरम्यान याच मतदारसंघात मनसेचे वरिष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांची देखील मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेना अधिक धोका उचलेल अशी शक्यता कमी आहे. मात्र जर वरळी पेक्षा शिवसेनेने शिवडीला प्राधान्य दिलातर मात्र तुंबळ युद्ध पाहायला मिळेल अशी शक्यता अधिक आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या