19 April 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

Post Office RD Vs Mutual Fund | पोस्ट ऑफिस RD फायद्याची की म्युचुअल फंड? 1000 रुपये गुंतवणुकीत कुठे अधिक पैसे मिळतील पहा

Post Office RD vs Mutual Fund

Post Office RD Vs Mutual Fund | दीर्घ कालीन गुंतवणूक नेहमीच दीर्घ काळात अप्रतिम परतावा कमावून देते. आपल्या जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणूक बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता नियमित गुंतवणूक करून कडक परतावा कमवायचा असेल तर, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. दुसरीकडे जर तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाजारातील जोखीम घेऊन सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट करु इच्छित असाल तर, म्युचुअल फंड एसआयपी हा तुमच्यासाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर निश्चित उत्पन्नरुपी परतावा दिला जाईल. आरडी स्कीमचे व्याजदर पूर्व निर्धारित असतात. या स्कीम गुंतवणूक केल्यास कोणत्याही रिस्कला सामोरे जावे लागत नाही. दुसरीकडे, म्युच्युअल फंड एसआयपी ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, परंतु यात मिळणारा परतावा खूप आकर्षक असतो.

पोस्ट ऑफिस RD योजना :
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही किमान 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल रक्कम मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्किमवर सध्या 5.8 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते.

समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये दरमहा 500 रुपये जमा करत असाल तर पाच वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर 69694 रुपये परतावा रक्कम मिळेल. यामध्ये तुमची एकूण प्रत्यक्ष गुंतवणूक 60,000 रुपये असेल, आणि त्यावर तुम्हाला 9,694 रुपये व्याज परतावा मिळेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही पोस्ट ऑफीस RD स्कीममध्ये मासिक 5,000 रुपये जमा केले तर पुढील 5 वर्षांत तुम्हाला तुम्हाला 3,48,480 रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 3 लाख रुपये असेल, त्यावर तुम्हाला 48,480 रुपये व्याज परतावा मिळेल.

Mutual Fund SIP :
जर तुम्ही थोडी मार्केट रिस्क घेऊन म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर दीर्घ काळात तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंड योजनामध्ये तुम्ही दरमहा किमान 1,000 रुपये जमा करून एसआयपी सुरू करू शकता. दीर्घ मुदतीत बहुतेक म्युचुअल फंड एसआयपी योजना सरासरी वार्षिक 12 टक्के परतावा देतात.

समजा, तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये 1,000 रुपयांची मासिक गुंतवणूक सुरू केली तर,आणि त्यावर तुम्हाला वार्षिक सरासरी वार्षिक 12 टक्के रिटर्न मिळाला, तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 82,486 रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 60,000 रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला 22,486 रुपये व्याज परतावा मिळेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही दरमहा 5,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली तर, पुढील 5 वर्षांत तुम्हाला 4,12,432 रुपये परतावा मिळेल. या एसआयपीमध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 3 लाख रुपये होईल. आणि त्यावर तुम्हाला 1,12,432 रुपये व्याज परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Comparison between Post Office RD vs Mutual Fund for long term investment to earn huge returns on 08 December 2022.

हॅशटॅग्स

Post Office RD vs Mutual Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x