29 March 2024 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

LIC Mutual Fund | एलआयसी शेअरमध्ये पडझड, मात्र 'या' एलआयसी म्युचुअल फंड योजनेत मल्टिबॅगर परतावा, योजना सेव्ह करा

LIC Mutual fund

LIC Mutual Fund | काही दिवसापूर्वी ‘अदानी समूहा’ च्या कंपन्यांवर हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलिंग फर्मने नकारात्मक अहवाल जाहीर केला. आणि एलआयसी कंपनीचे शेअर्स त्या वादात चर्चेत आले. वास्तविक एलआयसीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये 36000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. अदानी समूहातील कंपनीच्या शेअर्स घसरणीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी होत चालले आहे. मागील 1 महिन्यात एलआयसी कंपनीचे शेअर्स 15 टक्के कमजोर झाले आहेत. तर मागील 1 वर्षात एलआयसी स्टॉक 31 टक्के खाली आला आहे. (LIC Mutual Fund Scheme, LIC Mutual Fund SIP – Direct Plan | LIC Fund latest NAV today | LIC Mutual Fund latest NAV and ratings)

एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये पडझड होत असली तरी, कंपनीच्या म्युच्युअल फंड योजनाची कामगिरी उत्तम आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांनी अल्पकालीन ते दीर्घ मुदतीत लोकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. जर तुम्ही एलआयसी म्युचुअल फंड योजनांमध्ये दीर्घकाळ पैसे लावले असते, तर तुमची संपत्ती अनेक पट वाढली असती. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या सर्व योजना दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बंपर रिटर्न देणाऱ्या ठरल्या आहेत. असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना 20 वर्षे सतत दुहेरी अंकी CAGR परतावा मिळवून दिला आहे.

एलआयसी म्युच्युअल फंड लार्जकॅप फंड :
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड योजनेत 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17,09,302 रुपये झाले असते. जर तुम्ही दरमहा 5 हजार रुपयांची एसआयपी केली असती तर, 20 वर्षात त्याचे मूल्य 50 लाख रुपये झाले असते. या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणुकीवर 17 पट परतावा मिळला तर SIP मध्ये एकूण ठेवीच्या 4 पट परतावा मिळाला आहे.

एलआयसी म्युच्युअल फंड टॅक्स स्कीम :
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड योजनेत 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12,90,103 रुपये झाले असते. जे तुम्ही दरमहा 5 हजार रुपये एसआयपी गुंतवणूक केली असती तर, आज त्याचे मूल्य 52.74 लाख रुपये झाले असते. म्हणजेच एकरकमी गुंतवणुकीवर तुम्हाला 13 टक्के CAGR परतावा मिळाला असता, तर SIP मध्ये तुमचे पैसे 4 पट वाढले असते.

एलआयसी म्युच्युअल फंड S&P BSE सेन्सेक्स इंडेक्स स्कीम :
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड योजनेत 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12,58,686 रुपये झाले असते. त्याच वेळी जे तुम्ही दरमहा 5 हजार रुपये एसआयपीमध्ये लावले असते, तर आज त्याचे एकूण मूल्य 56.18 लाख रुपये झाले असते. ही म्युचुअल फंड योजना एकरकमी गुंतवणुकीवर 12.50 टक्के CAGR परतावा कमावून देते तर, एसआयपीमध्ये गुंतवणुकीच्या 4 पट अधिक परतावा मिळतो.

एलआयसी म्युच्युअल फंड निफ्टी 50 इंडेक्स प्लॅन :
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड योजनेत 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10,92,643 रुपये झाले असते. त्याच वेळी जर तुम्ही दरमहा 5 हजार रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर, तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 51.90 लाख रुपये झाले असते. या म्युचुअल फंड योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर 11 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे, तर SIP मध्ये गुंतवणुकीच्या सुमारे 4 पट अधिक परतावा मिळाला आहे.

एलआयसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप फंड :
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड योजनेत 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 10,63,922 रुपये झाले असते. त्याच वेळी, दरमहा 5 हजार रुपयांची एसआयपी गुंतवणूक केली असती तर, तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 43.44 लाख रुपये झाले असते. या म्युचुअल फंड योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर 11 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे, तर SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 3.5 पट अधिक परतावा मिळतो.

लिस्टिंग झाल्यापासून शेअर पडतोय :
एलआयसी कंपनीचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून नुसता पडत्या दिशेने ट्रेड करत आहेत. मागील वर्षी एलआयसी कंपनीचे शेअर्स जबरदस्त चर्चेत असूनही आयपीओ फ्लॉप गेला होता. 949 रुपयांच्या IPO किमतीच्या तुलनेत मागील शुक्रवारी शेअरची किंमत 37 टक्क्यांनी कमी होऊन 599 रुपयांवर क्लोज झाली होती. आता पर्यंत एलआयसी कंपनीने 2 लाख कोटींहून अधिक बाजार भांडवल गमावले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Mutual Fund scheme latest NAV on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#LIC Mutual Fund(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x