20 April 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

Mutual fund Portfolio Shares | पटापट नोट करा! अनेक म्युचुअल फंड कंपन्यांनी हे शेअर्स खरेदी केले, तगड्या कमाईचे संकेत, डिटेल्स वाचा

Mutual fund Portfolio Share

Mutual Fund Portfolio Shares | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. भारतातील काही दिग्गज म्युच्युअल फंड हाऊसनी या स्मॉल काव कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. भारतातील टॉप 4 म्युच्युअल फंड हाऊसेसनी मागील एका महिन्यात मिठाई आणि स्नॅक्स बनवणाऱ्या बिकाजी फूड्स या स्मॉलकॅप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या फंड हाऊसेसनी बिकाजी फूड्स कंपनीचे 100 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. आज BSE निर्देशांकावर बिकाजी फूड्स कंपनीचा शेअर्स 387.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods Share Price | Bikaji Foods Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)

बिकजी फुड – Bikaji Foods Share Price
आदित्य बिर्ला सन लाइफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनी , एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी , आयसीआयसीआ प्रुडेन्शियल,कोटक म्युच्युअल फंड या सारख्या मोठ्या दिग्गज म्युचुअल फंड हाऊसेसनी बिकजी फुड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. आकडेवारी नुसार पाहिले तर आपल्याला समजेल की कोणत्या म्युचुअल फंड हाऊस ने किती गुंतवणूक केली आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने बिकाजी फूड कंपनीचे 59 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मधे जोडले आहेत. IPO मध्ये बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स 300 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या स्नॅक्स निर्मात्या कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

आर्कियन केमिकल्स – Archean Chemicals Share Price
SBI म्युचुअल फंडने Archean Chemicals या कंपनीचे 453 कोटी रुपये किमतीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. बिकाजी फूड्स इंटरनॅशनल व्यतिरिक्त या मोठ्या म्युच्युअल फंड हाऊसेसनी Archean Chemicals कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, कोटक म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये Archean केमिकल्स कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले होते. SBI म्युच्युअल फंडाने नोव्हेंबर 2022 मध्ये 453 कोटी रुपये किमतीचे आर्कियन कैमिकल्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. याशिवाय आदित्य बिर्ला एएमसीने नोव्हेंबर 2022 मध्ये फ्यूजन मायक्रो फायनान्स, ग्लोबल हेल्थ, युनिपार्ट्स इंडिया, कीस्टोन रिअल्टर्स या सारख्या नवीन IPO कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.

इतर शेअर्स
त्याच वेळी HDFC AMC ने आर्कियन केमिकल्स कंपनीचे आणि बिकाजी फूड्स व्यतिरिक्त ग्लोबल हेल्थ, फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स, युनिपार्ट्स, या सारख्या नवीन IPO कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2022 मध्ये खरेदी केले आहेत. कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाने नोव्हेंबर 2022 मध्ये आर्चियन केमिकल्स, ग्लोबल हेल्थ, बिकाजी फूड्स, मेट्रोपोलिस हेल्थकेअर, या नवीन IPO कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual fund Portfolio Shares List for good return in future check details on 16 December 2022.

हॅशटॅग्स

Mutual fund Portfolio Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x