13 December 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Mutual Fund SIP | अवघ्या 3000 रुपयाच्या बचतीवर व्हाल कोट्यधीश, हा फॉर्मुल्या समजून घ्या, छप्परफाड कमाई करा - Marathi News

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | भारतातील बरेच मध्यमवर्गीय व्यक्ती म्युचल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे पसंत करतात. दरम्यान एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे हे नागरिकांना सुरक्षिततेचे वाटते. तुम्ही आता 3000 गुंतवणूक करून चक्क कोट्यधीश बनू शकता.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोपा पर्याय :
SIP सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीकडे एका सिस्टिमॅटिक प्लॅनप्रमाणेच पाहिले जाते. भारतातील बरेचसे नागरिक एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपले पैसे गुंतवणे पसंत करतात आणि त्यांना हा पर्याय सोपा देखील वाटतो. परंतु एसआयपीचे काही नियम आहेत. हे नियम फार कमी लोकांनाच माहित आहेत. तुम्ही एसआयपीच्या संपूर्ण नियमांची माहिती घेतली नाही तर, तुम्हाला फायदयाऐवजी तोटा देखील सहन करावा लागू शकतो.

एसआयपीचे सिक्रेट प्लॅन :
एसआयपीचे सिक्रेट प्लॅन एकदा तुम्हाला माहित झाले की, तुमचा तोटा कधीही होणार नाही. उलट तुम्हाला एसआयपीमध्ये योग्य रीतीने पैसे कसे गुंतवावे याची शाश्वती येईल. एसआयपीच्या काही नियम आणि अटींचं पालन करून तुम्ही फार कमी गुंतवणुकीत कोट्यधीश होऊ शकता.

70:15:15 फॉर्मुल्या आहे महत्त्वाचा :
एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही 70:15:15 या फॉर्मुल्याचा वापर करून पैशांचं बजेट ठरवू शकता. फॉर्मुलानुसार समजा तुम्हाला दरमहा 20 हजार पगार आहे. तर, या पगारातील 70% रक्कम तुम्हाला घर खर्चासाठी बाजूला काढून ठेवायची आहे. याचाच अर्थ 20 हजारातील 70% च्या हिशोबाने अमाऊंट बाजूला काढली तर तुम्ही 14 हजार घर खर्चासाठी बाजूला काढत आहात.

शिल्लक राहिलेल्या रकमेचं नियोजन :
20 हजार पगारातील 70% रक्कम बाजूला काढल्यानंतर तुमच्या हातात 6 हजार रुपये उरतात. आता या 30% रक्कमेतून तुम्हाला 15% रक्कम आपत्कालीन परिस्थितीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे आणि उरलेले 3000 कोणत्याही म्युचल फंडमध्ये किंवा म्युचल फंड एसआयपीमध्ये गुंतवायचे आहेत. कमी पगारातून देखील अगदी उत्तमपणे नियोजन करता येते.

कॅल्क्युलेशन समजून घ्या :
समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला सारख्याच पद्धतीने पैशांचं नियोजन करून सातत्याने दरमहा 3000 रुपये एसआयपीमध्ये गुंतवत असाल तर, एका वर्षात तुमच्या खात्यात 36 हजार रुपये जमा होतील. तुम्ही गुंतवणुकीचा सातत्य 30 वर्षापर्यंत ठेवलं तर, प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने तुमच्या खात्यात 10 लाख 80 हजार रुपये जमा होतील. या गुंतवणुकीवर तुम्हाला 12% व्याजदर देखील मिळेल सोबतच चक्रवाढ व्याज देखील लाभेल. व्याजदराच्या हिशोबाने तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर व्याजाचे पैसे मिळवून एकूण रक्कम 95 लाख 9 हजार 714 रुपये व्याजदराची मिळतील. सोबतच व्याजाची रक्कम एकत्र केल्यावर तुम्हाला 1 कोटी 5 लाख 89 हजार 714 रुपये मिळतील. एसआयपीच्या माध्यमातून अगदी कमी पैशांची गुंतवणूक करून देखील तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x