 
						SBI Mutual Fund | एसबीआयच्या विविध म्युच्युअल फंड योजना मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यामधील एका योजनेने गुंतवणूकदारांना डबल करोडपती बनवलं आहे. या छप्परफाड योजनेचं नाव आहे एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड. या मल्टी बॅगर योजनेने टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सला जास्तीत जास्त परतावा मिळवून दिला आहे. काही व्यक्तींना या योजनेमध्ये पैसे गुंतवावे की नाही हेच समजत नाही. जाणून घ्या योजनेबद्दलची सर्व माहिती.
एसबीआय टेक्नॉलॉजी ऑपॉर्च्युनिटी फंडाचे मागील प्रदर्शन पहा :
या जबरदस्त फंडाने 50 हजारांच्या एक रक्कमी गुंतवणुकीवर 5, 10 आणि 25 वर्षांमध्ये बक्कळ पैसा कमावून दिला आहे. या फंडाने 5 वर्षांमध्ये 50 हजाराच्या गुंतवणुकीवर 7,14,155 रुपये, 10 वर्षांच्या काळात 20,63,062 आणि 25 वर्षांमध्ये 2,00,70147 म्हणजेच एकूण 2 करोड रुपये मिळवून दिले आहेत.
एक रक्कमी गुंतवणुकीचे रिटर्न :
एसबीआयच्या या म्युच्युअल फंडाने एक रक्कमी गुंतवणुकीवर देखील जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर 3 आणि 5 वर्षांत चांगले बेंचमार्क रिटर्न दिले आहेत.
1) एका वर्षांत मिळालेले रिटर्न (CAGR) 36.12% बेंच मार्क (35.62)
2) तीन वर्षांचा मिळालेले रिटर्न 11.35% बेंच मार्क (9.53%)
3) पाच वर्षांत मिळालेले रिटर्न 26.14% बेंच मार्क (22.16%)
या योजनेची 1 लाख रुपयांची एक रक्कम गुंतवणूक सध्याच्या फंड व्हॅल्यूमधून 5 वर्षांत वाढून 3.32 लाख रुपये झाली आहे. त्याचबरोबर एक लाखाची गुंतवणूक देखील वाढून 30.60 लाख रुपये झाली आहे.
एसबीआय टेक्नॉलॉजी ऑपॉर्च्युनिटीज फंडाविषयी काही खास गोष्टी :
हा फंड एक प्रकारची ओपन इंडेड इक्विटी योजना आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि त्यासंबंधी गोष्टींशी याचा थेट संबंध येतो. या फंडाचा रिस्कबद्दल सांगायचे झाले तर, एफबीआयच्या टेक्नॉलॉजी ऑपॉर्च्युनिटीज फंडाकडे एका हाय रिस्क फंड म्हणून ओळखलं जातं. या योजनेची सुरुवात 1999 मध्ये 5 जुलै रोजी करण्यात आली होती. त्याचबरोबर योजनेचे बेंचमार्क BSE Teck TRI
गुंतवणूक करणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा :
1. मिनिमम एक रक्कम गुंतवणूक : 5,000
2. ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट : 1,000
3. कमीत कमी एसआयपी : 500 रूपये
4. एक्सपेन्स रेश्यो :
1) रेगुलर योजना : 1.9%
2) डायरेक्ट योजना : 0.84%
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		