23 April 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

SBI Mutual Fund | मुलांच्या भविष्यासाठी कुठे पैसे गुंतवता?, एसीबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना मुलांसाठी आहे, पैसा वेगाने पटीत वाढतोय

SBI Mutual fund

SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंड फर्म आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना घेऊन आली आहे, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही आपले पैसे अनेक पटींनी वाढवू शकता. SBI मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड ही SBI म्युचुअल फंडतर्फे सुरू केलेली एक विशेष योजना आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पैसे बचत करू शकता. या योजनेने केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दुप्पट गतीने तुमच्या मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करू शकता. SBI म्युच्युअल फंडाद्वारे चालवली जाणारी ही एक विशेष गुंतवणूक योजना आहे. सध्या, या म्युच्युअल फंड योजनेतील फंडचा आकार 580.64 रुपये असून या योजनेचे नेट अॅसेट व्हॅल्यू/एनएव्ही 24.7592 रुपये आहे. जर तुम्ही या योजनेत तुमच्या मुलांच्या नावावर गुंतवणूक करता, तर दीर्घकाळात तुम्ही एक मोठा फंड तयार करू शकता.

म्युचुअल फंडबद्दल थोडक्यात :
SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड शेअर बाजारातील सर्व उपलब्ध इक्विटी श्रेणीमधे गुंतवणूक करतो. या म्युच्युअल फंडातील 68.58 टक्के रक्कम भारतीय शेअर बाजारात इक्विटी शेअर्समध्ये गुंतवली जाते. फंडमधील 19.22 टक्के रक्कम लार्ज कॅप स्टॉक गुंतवली जाते, त्याचवेळी फंडातील 4 टक्के रक्कम मिड-कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवली जाते. याशिवाय म्युचुअल फंड मधील 19.19 टक्के रक्कम स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवली जाते. SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंडाने सरकारी रोख्यांमध्ये आपल्या एकूण गुंतवणूक रक्कमेच्या 10.18 रक्कम गुंतवली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट म्युचुअल फंडाने लॉन्च झाल्या आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. SBI ने मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट म्युचुअल फंड 29 सप्टेंबर 2020 रोजी लाँच केला होता. म्हणजेच हा म्युचुअल फंड नुकताच बाजारात लाँच झाला होता. गेल्या दोन वर्षांत या म्युचुअल फंड योजनेतून गुंतवणूकदारांनी 147.66 टक्के परतावा कमावला आहे. दुसरीकडे, वार्षिक दर वाढ आधारावर कमावलेला परतावा पाहिला तर तो सरासरी वार्षिक 56.69 टक्के होता. दुसरीकडे, या श्रेणीतील इतर म्युचुअल फंड योजनांनी 2 वर्षांत फक्त 22.61 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंडमध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती,तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.47 लाख रुपये झाले असते.

SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंडाचे SIP रिटर्न्स :
SIP रिटर्न म्हणजेच गुंतवणुकदार SIP स्कीम मार्फत म्युचुअल फंडमध्ये दीर्घकाळ नियमित गुंतवणूक करतात, आणि त्यावर गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याज पद्धतीने मजबूत परतावा मिळतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी SIP माध्यम ही सर्वात सोपी आणि फायद्याची गुंतवणूक पद्धत आहे. SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंडाच्या लॉन्चिंगच्या वेळी जर तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपयांची SIP सुरू केली असती, तर सध्या तुमची एकूण गुंतवणूक 2.40 लाख रुपये झाली असती. गेल्या दोन वर्षांत या म्युचुअल फंडाने SIP मोडद्वारे 37.13 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या व्याजदराने तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.39 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Mutual fund has launched Magnum Children benefits fund for long term investment and return on 10 October 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x