20 April 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

SIP Calculator | एसआयपी मॅजिक! दरमहा 1458 रुपये जमा करून स्वतःच घर खरेदी करू शकता, परतावा गणित समजून घ्या

SIP Calculator

SIP Calculator | भरघोस पैसे कमावून करोडपती होण्याचे स्वप्न आजकाल सगळेच बघत असतात. आजकाल एक चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे किमान 1 कोटीं रुपये शिल्लक निधी तयार पाहिजे. वयाच्या 60 व्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाल्यावर जर तुमच्या कडे किमान 1 कोटी रुपये जमा असेल तर तुम्हाला निवांत आयुष्य व्यतीत करता येईल. त्यासाठी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा आणि जास्तीत परतावा मिळवण्याचा प्रयत्न करा. आज या लेखात आपण 1 कोटीचा निधी तयार करण्यासाठी दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल, याचा हिशोब समजून घेणार आहोत.

5 वर्षांत 1 कोटीसाठी किती SIP गुंतवणूक करावी? :
जर तुम्हाला पुढील 5 वर्षांत 1 कोटी रुपये जमा करायचे असतील तर तुम्हाला म्युचुअल फंड SIP योजनेत दरमहा 135196 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्हाला या योजनेत वार्षिक सरासरी 8 टक्के – 12 टक्के परतावा मिळाला तर तुमच्या कडे पुढील 5 वर्षात 1 कोटी रुपये सहज जमा होईल. समजा तुम्ही SIP योजना वार्षिक सरासरी 10 टक्के परतावा देत असेल तर तुम्हाला दरमहा 128070 रुपये जमा करावे लागतील. जर तुमची SIP योजना सरासरी वार्षिक 15 टक्के रिटर्न देत असेल तर तुम्हाला 111506 रुपये जमा करावे लागेल. आणि जर तुम्हाला सरासरी वार्षिक 25 टक्के रिटर्न मिळत असेल तर तुम्हाला 83442 रुपये SIP गुंतवणूक करावी लागेल.

10 वर्षांत 1 कोटीसाठी किती SIP गुंतवणूक करावी?
जर तुम्हाला पुढील 10 वर्षांत 1 कोटी रुपये जमा करायचे असतील तर SIP गुंतवणूक करा. जर तुम्ही SIP योजना तुम्हाला वार्षिक सरासरी 8 टक्के परतावा देत असेल तर तुम्हाला दरमहा 54299 रुपये SIP गुंतवणूक करावी लागेल. त्याचप्रमाणे, वार्षिक सरासरी 10 टक्के परतावा मिळत असेल तर दरमहा 48414 रुपये SIP गुंतवणूक करावी लागेल. 15 टक्के परतावा मिळाल्यावर दरमहा 35887 रुपये आणि 25 टक्के परतावा मिळाल्यावर 18769 रुपये दरमहा SIP गुंतवणूक करावी लागेल.

15 वर्षांत 1 कोटीसाठी किती SIP गुंतवणूक करावी?
15 वर्षात 1 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी SIP मध्ये पैसे लावा. जर तुमची SIP योजना वार्षिक सरासरी 8 टक्के परतावा देत असेल तर तुम्हाला दरमहा 28708 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. 10 टक्के रिटर्नवर दरमहा 23928 रुपये, वार्षिक सरासरी 15 टक्के रिटर्नवर दरमहा 14775 रुपये आणि सरासरी 25 टक्के रिटर्नवर दरमहा 5114 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील.

20 वर्षांत 1 कोटीसाठी किती SIP गुंतवणूक करावी?
जर तुम्हाला पुढील 20 वर्षात 1 कोटी रुपये जमा करायचे असतील तर, SIP मध्ये पैसे लावा. जर तुमची SIP योजना तुम्हाला वार्षिक सरासरी 8 टक्के रिटर्न देत असेल तुम्हाला दरमहा 16865 रुपये SIP मध्ये जमा करावे लागतील. वार्षिक 10 टक्के रिटर्नवर 13060 रुपये दरमहा, 15 टक्के रिटर्नवर 6597 रुपये दरमहा आणि वार्षिक सरासरी 25 टक्के रिटर्नवर दरमहा 1458 रुपये SIP मध्ये जमा करावे लागतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP Calculator Return formula in Long term check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x