25 April 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार?
x

नाशिक: महाविकास आघाडीमुळे मनसेचे दिलीप दातीर यांचा पोटनिवडणुकीत पराभव

MNS Dilip Datir, MNS, Shivsena, Nashik By Poll, Raj Thackeray

नाशिक: नाशिकमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप दातीर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर या प्रभागात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. खान्देशी मतं ठरली निर्णायक ठरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या पोटनिवडणुकीत निच्चांकी मतदान झालं होतं. नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागी भाजपचा पराभव झाला आहे. प्रभाग २६ मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव, २२ मध्ये महाविकास आघाडीचे जगदीश पवार विजयी झाले. जाधवांकडून मनसेचे दिलीप दातीर पराभूत झाले आहेत, मात्र भाजप थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने ३ वर्षांपूर्वीची भाजपची लाट ओसरली आहे असंच म्हणावं लागेल.

राज्यातील सत्तेचं टॉनिक मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.

मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे प्रभाग क्रमांक १४१ मधून विजयी झाले. लोकरेंनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव केला.

मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात महाविकास आघाडीतील नवा मित्रपक्ष काँग्रेस आणि जुना मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष उभे ठाकले होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना ४ हजार ४२७ मतं मिळाली, तर भारतीय जनता पक्षाच्या दिनेश पांचाळ यांना ३ हजार ०४२ मतं पडली. त्यामुळे १ हजार ३८५ मतांनी दिनेश पांचाळ पराभूत झाले. काँग्रेसच्या अल्ताफ काझी यांना अवघी तीनशे मतं पडली.

 

Web Title:  MNS Candidate Dilip Datir Lost Nashik By Poll Election against Mahavikas Aghadi.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x