14 December 2024 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

अब्दुल सत्तारांच्या सभेत जमलेल्या लोकांना विनंती करूनही सभेतून उठून गेले? खुर्च्या खाली, सत्तारांचा सभेतील व्हिडिओ व्हायरल

Abdul Sattar

Minister Abdul Sattar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अनेक ठिकाणी आंदोलन करुन त्यांच्या राजीनाम्याची मागण केली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता वाटत असल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच अब्दुल सत्तार यांची कानउघडणी करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेसह इतर पक्षांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कानउघडणी करत तुम्ही माध्यमांना कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

दरम्यान काल अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाहीर सभा घेण्यात आली होती. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. एकाबाजूला औरंगाबादमधील विविध आदित्य ठाकरे यांच्या सभांमध्ये तुफान गर्दीतही लोकं जमिनीवर बसूनही शेवटपर्यंत प्रतिसाद देतं खिळून राहिल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे, अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाहीर सभेत खुर्च्या असूनही लोकं मोठ्या प्रमाणावर सभेतून निघून जाताना दिसले. विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या प्रमाणावर सभेतून निघून जाणं ही धोक्याची घंटा समजावी लागेल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट केला आहे. त्यात अब्दुल सत्तार उपस्थितांना अक्षरशः बसण्याची विनंती वजा धमकी देताना दिसत आहेत. मात्र तरी सुद्धा लोकं त्याकडे दुर्लक्ष करत सभेतून काढता पाय घेताना स्पष्ट दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणावर खुर्च्या खाली झाल्याचं पाहायला मिळालं.

शिंदे सरकारमध्ये असंतोषाचा स्फोट होईल
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. पण, आता भाजपने त्यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघात तयारी सुरू केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुढील सहा ते सात महिन्यात शिंदे सरकारमध्ये असंतोषाचा स्फोट होईल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं.

शिंदे गटाची उपुक्तता आता भाजपसाठी संपलेली आहे. ती फक्त सरकार स्थापन करण्यासाठी होती. भाजप यात यशस्वी झाली आहे. बीकेसी मैदानावर मेळावा घेतला तेव्हा शिंदे गटाची किती ताकद आहे, यात शिंदे गट उघडला पडला आहे. त्यामुळे भाजप आता शिंदे गटाला गृहीत धरत नाही, त्यांच्या मुळावर उठला आहे. भाजपने आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. प्रताप सरनाईक यांना मधल्या काळात थोडी सवलत मिळाली होती. जर प्रताप सरनाईक यांनी आपला मतदारसंघ सोडला नाहीतर ईडीकडून संपत्तीवर टाच आणली जाईल, असा दावा अंधारे यांनी केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Minister Abdul Sattar rally at Sillod Aurangabad video viral check details here 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Abdul Sattar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x