20 April 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > Vanrakshak Recruitment > Chandrapur Vanrakshak Exam Paper November 2007 VOL-2

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर परीक्षा नोव्हेंबर २००७ VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर वडिलांचे आजचे वय ४५ वर्ष व मुलाचे आजचे वय २० वर्ष असेल तर ५ वर्षानंतर मुलांचे वय हे वडिलांचे त्या वेळच्या वयाच्या ……..
प्रश्न
2
एके काळी हे ठिकाण ऊर्ध्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय होते. आज देखील येथे जुना जिल्हाधिकारी बंगला प्राणहिता नदीच्या काठावर वसलेला दिसतो. ते ठिकाण कोणते ?
प्रश्न
3
१५ सेंटीमीटर पाया व १० सेंटीमीटर उंची असलेल्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे ?
प्रश्न
4
२०-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा २००७ कोणत्या देशात आयोजित केली होती ?
प्रश्न
5
बल्लारपूर शहर हे खालीलपैकी कोणत्या गोंड राजाचे वसवले आहे ?
प्रश्न
6
‘ पिवळा, पांढरा, हिरवा, गुलाब ‘ यापैकी गटात न बसणारी बाब कोणती ?
प्रश्न
7
१० मुलांना एक किलोमीटर अंतर चालायला १५ मिनिटे लागतील तर २० मुलांना तेवढेच अंतर चालायला किती वेळ लागेल ?
प्रश्न
8
वर्तुळाचा संबंध गोलाकाराशी असेल, तर चौरसाच संबंध कशाशी असेल ?
प्रश्न
9
४, ९, १६, २५, ? या शृंखलेत प्रश्न चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ?
प्रश्न
10
आशा व उषा खेळाडू आहेत, संगीता व आशा गायिका आहेत, माधुरी व उषा नर्तिका आहेत. तर खेळाडू तसेच नर्तिका असलेली कोण आहे ?
प्रश्न
11
१५ मजूर एक विहीर १५ दिवसात खोदतात. तेवढीच विहीर दुसरे १० मजूर १० दिवसात खोदतात. तर दोन्ही मजुरांच्या टोळ्या एकत्र काम करायला लागल्या तर ती विहीर किती दिवसात खोदतील ?
प्रश्न
12
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ?
प्रश्न
13
ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
प्रश्न
14
२००१ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या किती होती ?
प्रश्न
15
खालील शृंखलेमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?३०२, ४०३, ५०४, ?, ७०६
प्रश्न
16
जर ६० आंब्याची विक्री किंमत २८० रुपये असेल तर ४० आंब्याची विक्री किंमत किती रुपये असेल ?
प्रश्न
17
चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंटचे कारखाने अधिक प्रमाणात आहेत, कारण या जिल्ह्यात खालील खनिजाचे साठे विपुल प्रमाणात आढळतात ?
प्रश्न
18
सर्व फलंदाज गोलंदाज नसतात. बबन हा फलंदाज आहे. जर हि दोन्ही विधाने बरोबर असतील, तर पुढीलपैकी कोणते विधान नक्की खरे आहे ?
प्रश्न
19
३५, ५०, ७५, ९८ यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती ?
प्रश्न
20
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे मुळ नाव कोणते ?
प्रश्न
21
खालीलपैकी औद्योगिक दृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
22
नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
23
चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली जाते?
प्रश्न
24
डॉ. अंभय बंग व डॉ. राणी बंग याच्या धानोरा येथील प्रकल्पाचे नाव काय?
प्रश्न
25
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पिक मोठया प्रमाणात घेतले जात होते ?
प्रश्न
26
एक माणूस १० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावत असेल तर ११५ किलोमीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती वेळ लागेल ?
प्रश्न
27
१ चौरस मीटर कापडातून २० सेमी X २० सेमी आकाराचे किती रुमाल तयार होतील ?
प्रश्न
28
विदर्भातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग किती आहे ?
प्रश्न
29
लोकर कापसा पेक्षा महाग आहे मात्र रेशमाइतकी नाही तर सर्वात महाग काय आहे ?
प्रश्न
30
२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर प्रत्येकी २० मीटर अंतरावर विद्युत खांब लावावयाचे असल्यास एकूण किती खांब लागतील ?
प्रश्न
31
माणसांंवरील वाघाच्या हल्ल्याच्या घटना खालीलपैकी कोणत्या वन विभागामध्ये वारंवार घडत असतात ?
प्रश्न
32
अवकाशात झेप घेणारी पहिली भारतीय वंशाची महिला कोण होती?
प्रश्न
33
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील लाकडाचे सर्वात मोठे व प्रमुख विक्री आगार कुठे आहे ?
प्रश्न
34
ताडोबाचे जंगलात वाघांपेक्षा ११ वाघिणी जास्त आढळल्या. जर वाघिणीची संख्या २६ असेल, तर दोन्ही मिळून एकूण किती वाघ प्राणी आहेत ?
प्रश्न
35
एक घनफूट लाकूड ४८० रुपयास विकले तर विक्री किंमतीच्या १/६ नफा होतो. तर नफ्याची टक्केवारी किती ?
प्रश्न
36
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर कोणते अभयारण्य आहे ?
प्रश्न
37
नगर पालिकेचे पाणी करात २०% वाढ केल्याने एका गृहस्थाने पाण्याचा वापर 20% ने कमी केला. तर त्याच्या खर्चात कितीने वाढ वा घट झाली ?
प्रश्न
38
अति मागास म्हणून ओळखली जाणारी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती ?
प्रश्न
39
कोणत्या अंकाची १५% संख्या २१ येईल ?
प्रश्न
40
रमेश, अनिता, मनोहर, राजेश यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता ?
प्रश्न
41
गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते ?
प्रश्न
42
विदर्भात न आढळणारी आदिवासी जमात कोणती आहे ?
प्रश्न
43
A, C, F, J, O, ? यामधील प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य अक्षर कोणते येईल ?
प्रश्न
44
चंद्रपूर जिल्ह्यात लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना कोठे आहे ?
प्रश्न
45
७ मीटर लांबी ५ मीटर रुंदी व ३.६ मीटर उंची असलेल्या आयाताकृती टाक्यामध्ये किती लिटर पाणी मावेल ?
प्रश्न
46
वर्तुळाच्या व्यासाची लांबी ७ सेंमी असल्यास त्याचा परीघ किती सेंमी असेल ?
प्रश्न
47
एक मुलगा ३४ मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिल्या मिनिटात तो ६ मीटर वर चढतो मात्र दुसऱ्या मिनिटाला तो त्यापैकी २ मीटर खाली येतो. तिसऱ्या मिनिटाला तो परत ६ मीटर वर चढतो मात्र चौथ्या मिनिटाला तो २ मीटर खाली येतो. या प्रक्रीयेप्रमाणे त्याला तो खांब चढण्यास किती वेळ लागेल ?
प्रश्न
48
जर AEGS बरोबर GKMK तर DFKO बरोबर काय ?
प्रश्न
49
शिवाजी राजे यांनी मराठी राज्याचे छत्रपती म्हणून १६७४ साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राज्याभिषेक केला ?
प्रश्न
50
भंडारा जिल्ह्यातील कोणत्या धरणाचा उपयोग गडचिरोली जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी होतो ?
प्रश्न
51
सुरजागड येथील डोंगर रांगात कोणते खनिज जास्त प्रमाणात आढळते ?
प्रश्न
52
गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभेचे किती निर्वाचन क्षेत्र ( मतदारसंघ ) आहेत ?
प्रश्न
53
जर ‘अ’ ही ‘ब’ ची पत्नी आहे. ‘ब’ हे ‘क’ वडील आहेत. ‘क’ हा ‘ड’ चा भाऊ आहे आणि ‘ड’ ही ‘ई’ ची बहिण आहे तर ‘अ’ आणि ‘ड’ यांच्यामध्ये कोणते नाते आहे ?
प्रश्न
54
समभूज त्रिकोण कोणत्या त्रिकोणास म्हणतात ?
प्रश्न
55
चंद्रपूर जिल्यात संरक्षण साहित्य निर्मितीचे केंद्र कुठे आहे?
प्रश्न
56
महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत होते.
प्रश्न
57
एक मनुष्य आपल्या मासिक पगारापैकी १/५ रक्कम स्वतासाठी खर्च करतो व उरलेल्या रकमेपैकी ४/५ रक्कम घर खर्चासाठी वापरतो, तरीही त्याचे जवळ २५००० रुपये दरमाह उरतात तर त्याचा मासिक पगार किती ?
प्रश्न
58
गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
59
चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन कोणते आहे ?
प्रश्न
60
चोपन जमीन सुधारण्यासाठी कोणत्या भू-सुधाराकांचा वापर करतात ?
प्रश्न
61
गरिबाचे लाकूड कशास महणतात ?
प्रश्न
62
जर x=5 आणि y=15 तर 2x+3y चि किंमत काय ?
प्रश्न
63
गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
64
क्रिकेट टिममधील ११ खेळांडूचे सरासरी वजन ६० कि.ग्र. आहे. १२ व्या राखीव खेळाडूसह सरासरी वजन ६१ कि. असल्यास राखीव खेळाडूचे वजन किती ?
प्रश्न
65
सोडवा :- (३+९) ÷ ३-१ = ?
प्रश्न
66
कोणत्या संताच्या नावे वनविभागातर्फे वनग्राम योजना सुरु केली आहे ?
प्रश्न
67
(१०००)² + १०० / १०० = ?
प्रश्न
68
परीक्षेमध्ये, प्रश्नाचे उत्तर बिनचूक लिहिले तर ६ गुण मिळतात व चुकीचे लिहिले तर २ गुण वजा होतात. महिपने सर्व १२ प्रश्न सोडवले व त्याला फक्त ४० गुण मिळाले. तर महिपणे किती प्रश्न बिनचूक सोडवले ?
प्रश्न
69
‘जंगलाचे देणंं’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
प्रश्न
70
‘विदर्भ’ या प्रदेशात समाविस्ट जिल्ह्याची संख्या किती आहे ?
प्रश्न
71
खालीलपैकी कोणत्या कालावधीत तेंंदुपानांचे संकलन केले जाते ?
प्रश्न
72
खालीलपैकी कोणत्या झाडाची फळे खाण्यायोग्य असतात ?
प्रश्न
73
दरसाल दर शेकडा १२ या व्याजाच्या दराने ३०००/- रुपयावर ५ वर्षात किती सरळ व्याज मिळेल ?
प्रश्न
74
वर्धा व वैनगंगा नदीच्या एकत्र प्रवाहाचे नाव काय आहे ?
प्रश्न
75
भारत कोणत्या वर्षी सार्वभीम झाला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x