17 April 2021 8:32 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-101

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अमेरिकन अध्यक्षीय (राष्ट्रपती) निवडणुकीसंबंधी योग्य विधाने निवडा. अ) या निवडणुकीद्वारे अमेरिकी अध्यक्ष हे जनतेद्वारा अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. ब) अमेरिकी अध्यक्ष हे देशाच्या कनिष्ठ सभागृहाचे (कॉंग्रेस) सदस्य असतात.
प्रश्न
2
‘कमला हरीस’ यांच्या विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ)कमला हरीस या भारतीय -अमेरिकन वंशांच्या अमेरिकेतील राजकारणी आहेत. ब) नुकतीच कमला यांची अमेरिकन सिनेटवर निवड झाली आहे. क) अमेरिकन सिनेटवर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अमेरिकन व्यक्ती ठरल्या आहेत.
प्रश्न
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी चुकीचे विधान/ने ओळखा. अ)ट्रम्प हे अमेरिकी ४५ वे राष्ट्रध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ब) ट्रम्प हे अमेरिकी राष्ट्रपती पदावर प्रथमच निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. क) ट्रम्प यांचा फोर्ब्ज मासिकाने जगातील सर्वाधिक ४०० श्रीमंतांमध्ये समावेश केला होता.
प्रश्न
4
आंतरराष्ट्रीय स्पर्धा समूहाविषयची (International Competition Network) विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) या समुहाची २०१८ ची वार्षिक परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे. ब) भारताचा स्पर्धात्मक आयोग हा या समुहाचा २००३ पासून सदस्य आहे.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील मध्यप्रदेश सरकारकडून दिला जाणार ‘कालिदास सन्मान’ पुरस्कार दिला जात नाही. अ) अभिजित संगीत           ब) अभिजात नृत्य क) साहित्य            ड) नाट्यकला
प्रश्न
6
खालीलपैकी कोणते चलनाच्या विमुद्रिकरणाचे उद्येश असू शकतात ? अ) अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशाचे संकट रोखणे. ब) देशात समांतर अर्थव्यवस्था तयार होण्यास हातभार लावणे क) दहशतवादासाठी वापरला जाणारा पैसा पुरवठा रोखणे.
प्रश्न
7
‘लक्ष भगीरथी’ या मोहिमेविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ही मोहीम छत्तीसगड सरकारकडून राबविली जात आहे. ब) या मोहिमेचा उद्येश अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांना पूर्ण करणे हा आहे.
प्रश्न
8
आशिया पसिफिक आर्थिक सहकार्य (Asia pacific Economic Cooperation) APEC या समूहाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) या समूहामध्ये आशिया पसिफिक भागातील २१ देशांचा समावेश होतो. ब) प्रादेशिक व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी या समुहाची स्थापना १९८९ साली केली गेली आहे. क) या समुहाचे (मंचाचे) मुख्यालय सिंगापूर येथे आहे.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या देशासह भारताने नोव्हेंबर २०१६ मध्ये नागरी-अणु क्षेत्रातील सहकार्य करार केला आहे.
प्रश्न
10
खालीलपैकी कोणते/ती विधान/ ने सत्य आहेत. अ) युनायटेड किंग्डमच्या ‘गाय रायडर’ यांची आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेवर महासंचालकपदी निवड झाली आहे. ब) आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या महासंचालकपदी गाय रायडर यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाला आहे.
प्रश्न
11
खालील विधाने विचारात घ्या. अ) ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून भारत सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्याचे घोषित केले होते. ब) अशा प्रकारची चलन रद्द करण्याची घटना भारतात प्रथमच यावेळी घडली आहे.
प्रश्न
12
रावी आणि बियास नदीच्या पाणी वाटपावरूनच्या वाद खालीलपैकी कोणत्या राज्यांदरम्यान सुरु आहे. अ)पंजाब           ब) हरयाणा         क)राजस्थान
प्रश्न
13
‘No More Tension Mobile app’ हे मोबाईल अप्लिकेशन खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने विकसित केले आहे.
प्रश्न
14
अ) जागतिक विज्ञान दिन २००१ पासून युनेस्कोतर्फे साजरा केला जातो . ब) २०१६ च्या जागतिक विज्ञान दिनाची संकल्पना “Celebrating Science Centres and Science Museums” ही आहे.
प्रश्न
15
सी.वी. रमन यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) सी.वी. रमन यांची १२८ वी जयंती ७ नोव्हेंबर २०१६ रोजी साजरी केली गेली. ब) रमण यांना ‘रमन परिणामा’ च्या शोधासाठी १९३० चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. क) रमण यांना १९५४ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
प्रश्न
16
जयंत सावरकर यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) सावरकर हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते आहेत. ब) त्यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. क) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळाला आहे.
प्रश्न
17
‘शांतता आणि विकसनासाठी जागतिक विज्ञान दिन’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी २०१६ ची ‘आशिया -पसिफिक आर्थिक सहकार्य’ (APEC) परिषदेच्या नेत्यांची परिषद भरविली जाणार आहे.
प्रश्न
19
प्रधानमंत्री युवा योजनेविषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ही योजना केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाच्या स्थापनेदिवशी सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
20
खालीलपैकी सत्य/विधाने कोणती. अ) अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ५८ टक्के मते मिळवून हिलरी क्लिंटन याचा पराभव केला. ब) डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. क) डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध पराभूत झालेल्या हिलरी क्लिंटन यांच्या पक्षाचे गाढव हे चिन्ह आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्र शासनाने नुकतेच ध्वनी पातळी प्रदूशनासंबंधी घातलेल्या नियमानुसार अ) शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल तर रात्री ४० डेसिबल ध्वनी मर्यादा ठरवून दिली आहे. ब) निवासी परिसरात दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल ध्वनी मर्यादा ठरवून दिली आहे.
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिली एल.एन.जी. (liquified Natural Gas) इधनावर आधारित बस सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
24
पुढील विधाने वाचा. अ) ‘एक छोटा माणूस’ हे जयंत सावरकर यांचे आत्मचरित्र आहे. ब) सूर्यास्त, ‘व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुझपाशी इ. नाटकांमधील भूमिका सावरकर यांनी साकारल्या आहेत.
प्रश्न
25
आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेविषयी (ILO) पुढील विधाने विचारात घ्या. अ) ही संघटना -संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर मजुरांच्या मुद्यांवर देणारी प्रश्नांवर लक्ष संयुक्त राष्ट्र संघाची संस्था आहे. ब) या संघटनेची स्थापना १९१९ साली असून १८७ देश या संघटनेचे सदस्य आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x