29 March 2024 8:44 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-107

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
युरोपियन युनियनविषयी योग्य विधान निवडा. अ) स्थापना ९ मे १९५० रोजी झाली. ब) युरोपियन युनियनमधून बाहेर पडणारा ब्रिटन हा पहिलाच देश आहे. क) सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क हे आहेत.
प्रश्न
2
जलयुक्त शिवार अभियानाविषयी योग्य विधाने निवडा. अ) या अभियानाचा उद्देश महाराष्ट्राला २०१९ पर्यंत पाणी टंचाई मुक्त करणे हा आहे. ब) या अभियानांतर्गत दरवर्षी ५००० गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचे उद्देशित आहे.
प्रश्न
3
योग्य विधाने शोधा. अ) केंद्रीय मंत्रिमंडळात १० महिला आहेत. ब) केंद्रीय कबिनेट मंत्री म्हणून ६ महिला कार्यरत आहेत. क) केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील फक्त एक महिला मंत्री आहे.
प्रश्न
4
भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे दुसरे राज्य ठरले असून येथे देशाच्या एकूण लोकसंख्येतील किती टक्के लोकसंख्या राहते.
प्रश्न
5
‘हिमायत’ योजनेसंबंधी योग्य पर्याय निवडा. अ) जम्मू आणि काश्मीर या राज्यातील तरुणांमधील रोजगार क्षमता विकसित करण्यासाठी ही योजना सुरु केली गेली आहे. ब) योजना सुरु झाल्यावर पुढील पाच वर्षात १ लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. क) ही योजना २०१४ साली केंद्र सरकारने सुरु केली आहे.
प्रश्न
6
गणितज्ञ नील्स हेनरिक आबेल यांच्या नावे गणितीय शास्त्राच्या सर्वोच्च योगदानासाठी दिला जाणारा पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो.
प्रश्न
7
राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर १२ सदस्यांची नेमणूक केली जाते. खालीलपैकी कोण राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नियुक्त झालेले नाहीत. अ) अनु आगा ब) एम.सी.मेरीकोम क) स्वप्नदास गुप्ता
प्रश्न
8
अणु पुरवठादार गटाबाबत काय खरे आहे. अ) या गटाची स्थापना १९४८ साली झाली. ब) भारत व पाकिस्तान हे देश या गटाचे सदस्य नाहीत. क) या गटात एकूण ४८ सदस्य देश आहेत.
प्रश्न
9
चुकीचे विधान शोधा. अ) केंद्रीय मंत्रीमंडळाने १५ जून २०१६ रोजी नव्या नागरी विमान वाहतूक धोरणाला मंजुरी दिली. ब) या धोरणानुसार एका तासाच्या विमान प्रवासासाठी केवळ २५०० रुपये तिकीट दर ठरविला आहे. क) या धोरणानुसार कंपन्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी केंद्राकडून ५० टक्के मदत दिली जाणार आहे.
प्रश्न
10
पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा आणि पाण्याचे नोबेल असे संबोधले जाणारे ‘स्टॉकहोम वॉटर प्राईज’ २०१५ या वर्षासाठी …….यांना देण्यात आला.
प्रश्न
11
राज्याचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प विधान सभेत सुधीर मूनगंटीवार यांनी मांडला तर विधान परिषेदत …………यांनी मांडला.
प्रश्न
12
भारतातील किती राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी महिला आहेत .
प्रश्न
13
योग्य पर्याय निवडा. अ) जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच ब्राझील या देशास गोवर मुक्त घोषित केले आहे. ब) गोवर हा आजार हवेच्या माध्यमातून प्रसार पावतो.
प्रश्न
14
कोणत्या क्षेत्राशी संबंधित शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने मधुकर गुप्ता यांची समिती स्थापन केली आहे.
प्रश्न
15
‘सोलर इंपल्स -२’ या सौरउर्जेवर आधारित विमानाने संपूर्ण जगाची फेरी नुकतीच पूर्ण केली या विमानाचा प्रवास कोठून सुरु झाला होता.
प्रश्न
16
कृषी मंत्रालयाने जरी केलेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये भार्र्तने फळांच्या उत्पादनात ……….क्रमांक मिळवला.
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा. अ) सातव्या वेतन आयोगाने अध्यक्ष ए.के.माथुर हे आहेत. ब) सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय सरकारी नोकरांचे किमान वेतन १८ हजार एवढे ठरविले आहे.
प्रश्न
18
महिला स्वयंसहायता बचत गटांना शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने कोणती योजना राबविण्याचे ठरविले आहे.
प्रश्न
19
२०१६ मध्ये टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावली.
प्रश्न
20
२०१४-१५ साठीचे ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना’ पुरस्कार मध्ये खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश नाही.
प्रश्न
21
२०१५ साली प्रकाशित झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार योग्य विधाने निवडा. अ) जागतिक क्रमवारीत नार्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे. ब) ०.६०९ निर्देशांक भारत १३० व्या क्रमांकावर आहे. क) हा निर्देशांकासह मोजताना लिंग गुणोत्तर आणि साक्षरता विचारात घेतली जाते.
प्रश्न
22
योग्य पर्याय निवडा. अ) १५ व्यालोकसभेत ५८ महिला खासदार होत्या. ब) १६ व्या लोकसभेत एकूण ५४३ सदस्यांपैकी 62 महिला खासदार आहेत.
प्रश्न
23
कौटुंबिक न्यायालयासंबंधी योग्य विधाने निवडा. अ) कौटुंबिक न्यायालयाची स्थपना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. ब) १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नागरी वस्तीसाठी हे न्यायालय स्थापन करता येते. क) लातूर येथे नुकतीच नवे कौटुंबिक न्यायालय सुरु करण्यास मान्यता दिली गेली आहे.
प्रश्न
24
देशातील सर्वात जुने निमलष्करी दल म्हणून कोणत्या दलाला ओळखले जाते, जे थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असते.
प्रश्न
25
ठाणे येथे पार पडलेल्या 96 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष कोण होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x