17 April 2021 9:23 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-160

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२० सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळचे अध्यक्ष रामबरन यादव यांनी देशाच्या सातव्या धर्मनिरपेक्ष संविधानास संमती दिली. याबाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ) या संविधानामध्ये ३७ भाग,३०८ कलमे,७ परिशिष्ट असणार आहे. ब) संसदेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात (कनिष्ठ सभागृहात) ३७६ सदस्य तर वरिष्ठ सभागृहात ६० सदस्य असणार आहे. क) राष्ट्रपती पदासाठी वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी. ड) पंतप्रधानांचा २ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव पास करता येणार नाही.
प्रश्न
2
१७ जुलै २०१५ रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ………Multidose च्या विक्रीवर बंदी घातली आहे.
प्रश्न
3
केंद्र सरकारने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लाॅस्टिक इंजिनीअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी (सीपेट) ला मंजुरी दिली आहे. औरंगाबादनंतर हे केंद्र राज्यातील दुसरे आणि विदर्भातील पहिले केंद्र आहे. दुसरे केंद्र ………. येथे स्थापन करण्यात येणार आहे.
प्रश्न
4
World Economic Forum (WEF) ने प्रसिद्ध केलेल्या २०१५ च्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशाकांत भारताचा १४० देशांमध्ये ……..क्रमांक लागतो .
प्रश्न
5
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाविषयी योग्य/विधान ने निवडा.\ अ) या महामंडळाची स्थापना १९६३ च्या केंद्रीय महसूल मंडळ कायद्यानुसार झाली आहे. ब) या मंडळात एक अध्यक्ष आणि सहा सदस्य असतात. क) प्राप्तीकर खातेसंबंधी धोरण ठरविणारी ही सर्वोच्च संस्था आहे.
प्रश्न
6
स्वीस बँक युबीएसच्या अहवालानुसार जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले शहर …….
प्रश्न
7
ऑक्टोबर २०१५ रोजी नासाचा द ऑप्टिकल कम्युनिकेशन अंँड सेंसर डेमॉनस्ट्र्रेशन (OCSD) या तंत्रज्ञान मोहीम मालिकेतील …………हा उपक्रम कार्यान्वित झाला आहे.
प्रश्न
8
२३ ऑगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर (जोशी) यांच्या हस्ते ……….ग्राम न्यायालयाचे उद्घाटन झाले आहे.
प्रश्न
9
इंग्लंड येथे २०१७ मध्ये होणाऱ्या आयसीसी चम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र संघांची घोषणा झाली. त्यामध्ये ……..हा संघ अपात्र ठरला आहे.
प्रश्न
10
‘लोक प्रहारी’ हे नाव नुकतेच चर्चेत होते,लोक प्रहारी हे …………आहे.
प्रश्न
11
देशातील विक्रेयवस्तु बाजाराची (Commodity Market) नियंत्रक संस्था असणाऱ्या वायदा बाजार आयोगाचे (Forward Market Commission) भांडवली बाजार नियंत्रक संस्थेत म्हणजे सेबीमध्ये …………. ला विलीनीकरण करण्यात आले आहे.
प्रश्न
12
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची वर्षभर साजरी करण्यासाठी ………..अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहे.
प्रश्न
13
जी-२० शिखर परिषद २०१६ साठी भारतातून …….कॅबीनेट मंत्री उपस्थित राहणार आहे.
प्रश्न
14
महाराष्ट्रामध्ये ३६ पैकी १८ जिल्ह्यांचे विभाजन करून त्यातून २२ नवीन जिल्हे तयार करण्यासाठी ……….अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
प्रश्न
15
Gangetic River Dolphins जो धोक्यात असणारा सस्तन प्राणी आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी डॉल्फिन रिझर्व्ह स्थापन करण्यात येणार आहे…………..या राज्यात .
प्रश्न
16
२९ ऑक्टोंबर २०१५ ला नेपाळच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी ………. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
17
अमेरिकेतील पेन (PEN) अमेरिकन सेंटरकडून दिला जाणार २०१६ चा पेन हेईम ट्रान्सलेशन फंड ग्रांट’ हा भाषांतरासाठीचा पुरस्कार -निधी ………दिला गेला आहे.
प्रश्न
18
केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाच्या अध्यक्षपदी  ………. यांची नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
19
‘अमेरिकन ओपन २०१५’ हा टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी विजेतेपद …….यांनी पटकाविले आहे.
प्रश्न
20
खगोलशास्त्राला समर्पित असलेल्या ‘अॅस्ट्रोसॅट या पहिल्या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून २८ सप्टेंबर २०१५ रोजी उड्डाण करण्यात आले अशा प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडणारा भारत हा जगातील ……देश बनला आहे.
प्रश्न
21
पर्यटन सुविधा आणि सेवा यांच्या सुधारणेसाठी भारताने …….यांच्या बरोबर कर्जकरार केला आहे.
प्रश्न
22
भारत इस्त्रालय दरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी भारताने ………. युद्धनौका इस्त्रायलच्या हाईफा बंदरात दाखल केली आहे .
प्रश्न
23
६ सप्टेंबर २०१५ रोजी नरेंद्र मोदी यांनी …………मेट्रो रेल्वेचे उदघाटन केले .
प्रश्न
24
स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ……प्रोग्राम सुरु होणारा आहे.
प्रश्न
25
२९ सप्टेंबर २०१५ रोजी पक्षाचे वार्षिक लेखापरीक्षण व आयकर विवरणपत्रे सादर न केल्याबद्दल …….पक्षाची मान्यता रद्य करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x