28 March 2024 5:17 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-81

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती ? १.जी.डी.खोसला समिती १९७०         २.मुखर्जी समिती १९९९ ३.डॉ.गोकर्ण समिती १९९८          ४.डॉ.सुब्रमण्यम समिती २०१२
प्रश्न
2
२०१६ क्रिकेट आशिया कप या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे म्हणता येणार नाही ? १. क्रिकेटचा अंतिम सामना ६/03/२०१६ रोजी कपूर बांगलादेश येथे खेळला गेला. २. या सामन्यात मॅन ऑफ मॅच म्हणून शिखर धवनला संबोधण्यात आले. ३. या सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज साबीर रहेमान याला मिळाले. ४. हा अंतिम सामना १५ ओव्हरचाच खेळला गेला.
प्रश्न
3
भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा २०१६ या संदर्भात पुढील काही विधाने दिली आहेत , त्यापैकी कोणत्या विधानाशी तुम्ही सहमत नाही ते सांगा. १. हा प्रजासत्ताक सोहळा ६७ क्रमांकाचा होता. २. या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे रशियाचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद उपस्थित होते. ३. या राजपथावर संचलनामध्ये प्रथमच रशियाचे पथक सहभागी होते.
प्रश्न
4
‘वन रंक वन पेन्शन’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
5
प्रो कबड्डी लीग २०१६ (सिझन-३) च्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य म्हणता येणार नाही ? १. अंतिम सामना दि.५ मार्च २०१६ रोजी दिल्ली या ठिकाणी खेळला गेला. २. अंतिम सामन्यात विजेता संघ पटना पायरेट्स हा होता. ३. उपविजेता संघ यु मुंबा हा तर तिसरा क्रमांक पुणेरी पलटण होता. ४. २०१५ चा (सिझन – २) विजेता संघ यु मुंबा हा होता.
प्रश्न
6
३० डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेले आमदार व त्यांचे मतदारसंघ पुढे दिलेले आहेत, त्यामध्ये योग्य जोड्या जुळवा. अ. भाई जगताप          १.अकोला/बुलढाणा/वाशीम ब.प्रशांत परिचारक           २.धुळे/नंदुरबार क.अमरिश पटेल           ३.सोपापूर ड. गोपीकिशन बाजेरीया          ४.मुंबई
प्रश्न
7
चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? १. या पुरस्काराची सुरुवात १९६९ पासून सुरु झाली . २. आतापर्यंत जवळपास एकूण ४६ व्यक्तींना पुरस्कार मिळाला. ३. २०१५ चा हा पुरस्कार मनोज कुमार यांना प्राप्त झाला . ४. २०१४ चा पुरस्कार शशीकपूर यांना प्राप्त झाला .
प्रश्न
8
स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेच्या बद्दल पुढे काही माहिती दिलेली आहे. त्यातील कोणत्या विधानाशी तुम्ही सहमत आहात ते सांगा. १. २६ नोव्हेंबर २०१५ ला स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. २. या योजनेंतर्गत (२०१५-१६) मध्ये २ लाख विमा योजनेसह सरकारने मंजुरी दिली आहे. ३. राज्यातील महसूल विभागातील सातबारा नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील सुमारे १ कोटी ३७ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला. ४. सदर योजना दिवसाच्या २४ तासांसाठी लागू असून शेतकरी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही संस्थेने विमा कंपनीकडे पैसे भरण्याची गरज नाही.
प्रश्न
9
सातव्या वेतन आयोगाच्या १ जानेवारी २०१६ रोजी लागू करण्यात आलेल्या शिफारशीमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश दिसून येत नाही ? १. सर्व सरकारी नोकरांना वेतनात २३.५५ टक्के वाढ २. प्रत्येक वर्षात वेतनात ५ टक्के वाढ करण्याची शिफारस ३. निवृत्तीवेतन १४ टक्के वाढीची शिफारस केली. ४. वेतनवाढ भारताच्या जीडीपीच्या ०.६५ टक्के ते ०.७० टक्के या दरम्यान राहील.
प्रश्न
10
युनेस्कोचा अवार्ड ऑफ एक्सलन्स -२०१५ संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? १. केरळमधील बडडाकुमनाथन या मंदिराला युनेस्कोचा अवार्ड ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार प्राप्त झाला. २. युनेस्कोच अशा प्रकारचा अवार्ड भारताला ४ वेळा मिळाला आहे. ३. केरळमधील हे मंदिर ५० वर्षे जुने असून या मंदिराची उभारणी अतिशय चांगली आहे. ४. केरळमधील या मंदिरासाठी स्थानिक लोकांऐवजी विदेशी नागरिकांनी गतवैभव मिळवून दिले.
प्रश्न
11
अ-न्यायाधीश साकिब निसार यांची पाकिस्ताच्या २५ व्या मुख्य ब्यायाधीशपदी नियुक्ती झाली. ब- सध्या पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी वाझ शरीफ आहेत. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा .
प्रश्न
12
७ व्या वेतन आयोगाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य वाटत नाही ? १. ७ व्या वेतन आयोगाची स्थापना तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग सरकारने २०१४ मध्ये केली. २.या आयोगाचे अध्यक्ष माजी न्या.अशोक कुमार माथुर यांनी काम केले. ३. या आयोगाचे सचिव शालिनी अग्रवाल यांनी काम केले. ४.या आयोगाचे सदस्य विवेक रॉय, सचिन सरदेसाई, रघुवीर दयाल यांनी काम केले.
प्रश्न
13
३० डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधीकडून निवडून आलेल्या आमदारांमध्ये कोणत्या व्यक्तीच्या समावेश नाही १. अरुण जगताप          २.प्रशांत परिचारक ३.रामदास फुटाणे          ४.अमरिश कदम ५.गोपीकिशन व्यास          ६.सतेज पटेल
प्रश्न
14
२०१५ चा महात्मा फुले समता पुरस्कार पुढीलपैकी कोणाला देण्यात आला ?
प्रश्न
15
३० डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेले आमदार व त्यांचे पक्ष दिलेले आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. १. शिवसेना           -अमरिश पटेल २.राष्ट्रवादी कॉंग्रेस           -सतेज पाटील ३.कॉंग्रेस            -अरुण जगताप ४. भाजपा            -गोपीकिशन बाजेरीया
प्रश्न
16
परिस हवामान बदल परिषद २०१५ च्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. १. ही परिषद ल. बुर्जे (परिस,फ्रान्स) या ठिकाणी पार पडली. २. या परिषदेचा कालावधी ३० नोव्हेंबर २०१५ ते १२ डिसेंबर २०१५ हा होता. ३. या परिषदेचे अध्यक्ष लॉरेन्स फ्रब्रियास हे होते. ४. या परिषदेमध्ये परिस येथे जवळपास 195 देशांनी सहभाग घेतला.
प्रश्न
17
सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ व पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आयोगाचे अध्यक्ष व त्यांचे वर्ष पुढे दिलेले आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. वर्ष                अध्यक्ष अ)१९८३                १)बी.एन.श्रीकृष्ण ब)१९९४                २)एस.रन्तवेल पंडीयन क)२००६               ३)पी.एन.सिंघल ड)२०१६                ४)ए.के.माथुर
प्रश्न
18
मोहीम आदित्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते सांगा. १. भारताच्या इस्त्रो, आयुका, पुणे, Tata institute of fundamental research यांनी संयुक्तरीतीने ही मोहीम सुरु केली. २. सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास तसेच हवामानाचा अंदाज वर्तविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ३. इस्त्रोने ही मोहीम २००८ पासून सुरु केली होती . ४.या मोहिमेचा एकूण खर्च ४०० कोटी रुपये आहे.
प्रश्न
19
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा . १. ६ जानेवारी २०१६ रोजी उत्तर कोरिया या देशाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा केली. २. सर्वप्रथम १९५२ मध्ये अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची निर्मिती केली. ३. हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा १०० पटीने अधिक संहारक असतो. ४. अणुबॉम्ब केंद्रकीय विखंडन तर हायड्रोजन बॉम्ब हा केंद्रकीय सम्मीलन या तत्वावर काम करतो.
प्रश्न
20
अ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे मुख्यालय मुंबई येथे आहे. ब) सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर आहेत. क) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) चे मुख्यालय लंडन येथे आहे. वरीलपैकी अयोग्य विधान निवडा.
प्रश्न
21
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. १. चीन व दक्षिण चिनी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारत व्हिएतनाममध्ये उपग्रह केंद्र उभारणार आहे. २.या उपग्रहासाठी इस्त्रोकडून निधी मिळणार आहे . ३. या प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास ३.२ कोटी डॉलर असेल. ४.सटेलाईट ट्रकिंग आणि इमर्जिंग सेंटरद्वारे भारताला छायाचित्र मिळण्यासाठी मदत होईल.
प्रश्न
22
सर्वोच्च न्यायालयातील न्या. तीर्थसिंह ठाकूर यांच्यासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे . १. भारताचे ४३ वे सरन्यायाधीश होते. २.सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश न्या.एच.एल.दत्तू यांच्या जागी न्या. तीर्थसिंह ठाकूर यांची नियुक्ती झाली . ३.न्या.तीर्थसिंह ठाकूर हे जम्मू काश्मीरचे असून त्यांनी कर्नाटक, दिल्ली या उच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून काम पहिले. ४.सध्या भारताचे मुख्य न्यायाधीश जे.एस.खेहर आहेत.
प्रश्न
23
पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य वाटत नाही ते सांगा . १ दिल्ली राज्य सरकारने प्रदुषणाला प्रतिबंध घालण्यासाठी १ जानेवारी २०१६ पासून सम-विषम क्रमांकांची वाहने सम-विषम तारखांना रस्त्यावर आणण्याची अंमलबजावणी केली. हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. २. सर्वप्रथम सम-विषम वाहतुकीचा प्रयोग १८८९ मध्ये मेक्सिको या शहरामध्ये करण्यात आला. ३. २००८ मध्ये बीजिंगमध्ये ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धेअगोदर या पद्धतीचा उपयोग करून ५०% प्रदूषण कमी केले होते. ४. २८ डिसेंबर २०१५ मध्ये इटलीमध्ये मिलन व रोम या दोन शहरात या पद्धतीचा वापर नुकताच करण्यात आला.
प्रश्न
24
भारत-अरब २०१६ साझेदारी संमेलन कोणत्या देशात पार पडले ?
प्रश्न
25
प्रणव धनावडे या क्रीक्रेट खेळाडूबद्दल पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. १. प्रणव धनावडे याने एच.टी.भंडारी आंतरशालेय स्पर्धेत मुंबई येथे १००९ धावा काढण्याचा विक्रम केला. २. प्रणव धनावडे याचा ३२३ चेंडूमध्ये १००९ धावा काढण्याचा जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम विक्रम आहे. ३. या अगोदरचा विक्रम ए.इ.जे. क्वालीन्स याने नाबाद ६२८ धावा केल्या. ४. प्रणव धनावडे याचा १२९ चौकार व ५९ षटकारचा समावेश आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x