17 April 2021 8:42 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-87

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगभरातील लोकांमध्ये त्सुनामीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय त्सुनामी जागरूकता दिन पाळला जातो ?
प्रश्न
2
‘बर्ड फ्ल्यू’ हा विषाणूजन्य आणि धोकादायक रोग असून मानवाला त्याची लागण प्रामुख्याने कोणत्या विषाणूमध्ये होते ? अ) एच१ एन १           ब)ए (एच ७ एन ९) क)बी (एच५ एन४)          ड) ए (एच५ एन१ )
प्रश्न
3
रंगभूमीवरील कामगिरीसाठी दिला जाणारा कालिदास सन्मान २०१६ या वर्षासाठी कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
4
पुढीलपैकी व्यक्ती आणि त्यांना मिळालेले पुरस्कार यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ) सर डेव्हिड कॉक्स           १) सांख्यिकीसाठीचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक ब)पॉल बीटी           २) मन बुकर पुरस्कार क) लामिया अजी बशर           ३) साखारोव्ह मानवी हक्क पारितोषिक ड) प्रज्ञा चोवटा            ४) फ्रान्सचा नाईटहूड सन्मान खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
5
मार्जार कुळातील हिमबिबटयाची संख्या बेकायदा शिकारीमुळे धोकादायक पातळीपर्यत कमी झालेली आहे. या प्राण्याचे वास्तव्य पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आढळते ?
प्रश्न
6
क्षेपणास्त्र, रॉकेट यंत्रणा, मानवरहित विमाने आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘एमटीसीआर’ संघटनेने किती किलोमीटर पल्ल्यापर्यंतच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या निर्यातीला मान्यता दिली आहे ?
प्रश्न
7
भारताच्या शेतीच्या क्षेत्रात असणाऱ्या डासानमार्फात पसरणाऱ्या फ्लव्हीव्हायरसमुळे कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो .
प्रश्न
8
पुढील विधाने विचारात घ्या. अ) ‘जनुकीय बदल’ तंत्रज्ञानावर विकसित केलेल्या पिकांच्या लागवडी खालील जगातील सर्वाधिक क्षेत्र युरोप खंडात अस्तित्वात आहे. ब)’ जनुकीय बदल’ तंत्रज्ञानावर आधारित जगातील प्रमुख पिकांमध्ये सोयाबीन आणि कनोला यांचा समावेश होतो. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
9
‘सिस्वहक्स ‘ ही पटटकृमीविरोधी जगातील पहिली लस भारतात अलिकडेच विकासीत करण्यात आली असून ती मानवातील ‘सिस्टीसेक्रोसीस’ या रोगावर लाभदायक आहे. या रोगामुळे मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम होतो ?
प्रश्न
10
भारतीय नौदलामध्ये अलिकडेच स्वदेशी बनावटीची अणुपाणबुडी सामील करण्यात आली आहे. मात्र भारतीय नौदलात पहिल्यांदा अणुपाणबुडी कधी सामील केली गेली ?
प्रश्न
11
भारताच्या अन्य देशांबरोबर होणाऱ्या युद्धसरावांच्या नावातील चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
12
पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ‘जी.एम.’ पिकांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे ? अ) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ           ब) अन्नसुरक्षेला बळकटी क) जमिनीच्या गुणवत्तेत वाढ           ड) मनुष्यबळात बचत
प्रश्न
13
अंटार्क्टिका सागरी जीवनसृष्टी संवर्धन आयोगाने मुख्यालय ……….येथे स्थित आहे.
प्रश्न
14
अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने उपविजेतेपद पटकावले होते ?
प्रश्न
15
अंटार्क्टिका सागरी जीवसृष्टी संवर्धन आयोगाने अलिकडेच कोणत्या प्रदेशाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले असून ते क्षेत्र जगातील सर्वात मोठे संरक्षित सागरी क्षेत्र ठरले आहे ?
प्रश्न
16
देशातील विभागीय परिषदा आणि त्यांची मुख्यालये यांच्या पुढे दिलेल्या पर्यायांमधील कोणती जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
17
आंतरराष्ट्रीय न्यायालयातून बाहेर पडण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला असून अशा प्रकारे या आधी कोणत्या देशाने निर्णय घेतला होता ?
प्रश्न
18
‘ सेडाई आराखडा’ कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
19
महाराष्ट्र सरकारचा २०१६ साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
20
समाजातील वंचित वर्गाला ग्रामपंचायतिच्या माध्यमातून कायदेशीर साहाय्य पुरवण्यासाठी कोणत्या राज्यात ‘मधुबाबू आईन सिबीर योजना’ सुरु करण्यात आली आहे ?
प्रश्न
21
पुढील विधाने विचारात घ्या. अ) ‘सिस्टीसेक्रोसीस’ रोग हे मानवाला अपस्मार होण्याचे महत्वाचे कारण आहे. ब)’सिस्टीसेक्रोसीस’ हा उष्ण कटीबंधात आढळणारा संसर्गजन्य रोग आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
22
एखाद्या सजीवाच्या पेशीतील गुणसुत्रामधील डी.एन.ए. च्या रचनेमध्ये बदल घडवून आणणे म्हणजे…………..
प्रश्न
23
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने आपल्या व्यवहारामध्ये खेळाडूंना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या ‘खेळाडू आयोगा’ मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे ?
प्रश्न
24
आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? अ) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संदेमध्ये कलम ९२ ते ९६ यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे ? ब) आंतरराष्ट्रीय न्यायालयात सहभागी होण्याचा किंवा त्यातून बाहेर पडण्याचा सदस्य देशांना अधिकार आहे.
प्रश्न
25
भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे क्षेत्र सध्या सुमारे ११ कोटी लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देत आहे. या क्षेत्रात राष्ट्रीय जीडीपीमध्ये किती टक्के वाटा आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x