17 April 2021 8:10 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-89

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘CHIRAG’ म्हणजे काय ?
प्रश्न
2
गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी माडण्यात आलेल्या या संकल्पनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही ?
प्रश्न
3
दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे शिक्षण बंद झाल्यास त्यांना भविष्यात उपजीविकेचे साधन प्राप्त करण्याची संधि मिळावी यासाठी कोणता उपक्रम सुरु करण्यात आला आहे ?
प्रश्न
4
रशियाने फास्ट -न्युट्रॉन अणुभट्टी प्रकल्पात सहभागी होण्याचे भारताला निमंत्रण दिले आहे. ही फास्ट -न्युट्रॉन अणुभट्टीमुळे कोणता लाभ होणार आहे ?
प्रश्न
5
‘सीपीईसी’ प्रकल्पाचा महत्वाचा भाग असलेल्या पाकिस्तानातील ग्वादर बंदराचे अलिकडेच उदघाटन करण्यात आले आहे. हा प्रकल्प चीनमधील कोणत्या प्रांताला खुल्या सागराशी थेट आणि जवळचा संपर्क उपलब्ध करून देणार आहे ?
प्रश्न
6
केंद्र सरकारची ‘शून्य वैगुण्य -शून्य परिणाम’ ही योजना कशाला प्रोत्साहन देते ?
प्रश्न
7
पुढील विधाने विचारात घ्या. अ) जागतिक बँकेच्या ‘Doing Business 2017_Equal Opportunity for all’ मध्ये व्यवसाय सुलभतेमध्ये भारताचे स्थान मागील वर्षाच्या तुलनेत उंचावले आहे. ब) उद्योगांसाठी वीज मिळविणे आणि कंत्राटांची अंमलबजावणी या दोनच बाबतीत भारताची कामगिरी सुधारली आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
8
आंतरराष्ट्रीय कायदा आयोगामध्ये अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीला सदस्यत्व मिळाले आहे ?
प्रश्न
9
‘ऊर्जा गंगा’ या योजनेला कोणत्या उद्देशाने सुरुवात करण्यात आलेली आहे ?
प्रश्न
10
केंद्र सरकारने सुरु केलेली ‘राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हब’ ही योजना कोणत्या उद्दिष्टासाठी राबवली जात आहे ?
प्रश्न
11
महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयानुसार, २०१६ पासून ……………. अ)दहावीचा निकालावर यापुढे ‘नापास’ असा शेरा छापण्यात येणार नाही. ब) तीन किंवा तीनपेक्षा कमी विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना’ केवल कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.
प्रश्न
12
पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. अ) ‘आयएलओ’ ची स्थापना १९१९ मध्ये व्हर्सायच्या तहातील तरतुदीच्या आधारे करण्यात आली . ब)’आयएलओ’ ला १९६९ मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
प्रश्न
13
‘जेनेटिक इंजिनीयरिंग अप्रायझल कमिटी’ ने DMH-११ ही प्रजात मानव व प्राणी यांच्यासाठी सुरक्षित असल्याचा अहवाल देऊन तिच्या व्यापारी वापराला परवानगी दिलेली आहे. ही प्रजात कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
प्रश्न
14
दर्जेदार शैक्षणिक संस्थांना मदतीने स्थानिक पातळीवरील सामाजिक व आर्थिक विकासासंबंधित प्रश्नांवर तोगडा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे ?
प्रश्न
15
सार्वजनिक प्रापण धोरण २०१२ नुसार (Public Procurement Policy, २०१२) मंत्रालये, सरकारी व विभाग, केंद्रीय सार्वजनिक उद्योग यांच्याद्वारे होणाऱ्या एकूण प्रापणापैकी किती टक्के हिस्सा अनुसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांकडून घेणे बंधनकारक आहे ?
प्रश्न
16
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत राज्यातील नागरीक आणि देशाच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने कोणत्या राज्याबरोबर अलिकडेच एक सामंजस्य करार केल आहे ?
प्रश्न
17
कमी पाण्यावर हेक्टरी जास्त उत्पादन देणारी ‘व्हीएसआय-०८००५’ ही नवी प्रजात नुकतीच विकसित करण्यात आल्याने शेतकऱ्याना त्याचा लाभ होणार आहे. ही प्रजात कोणत्या पिकांशी संबंधित आहे ?
प्रश्न
18
‘बिमस्टेक’ हे काय आहे ?
प्रश्न
19
योग्य जोड्या जुळवा. प्रमुख           संस्था अ) गाय रायडर           १)अन्न व कृषी संघटना ब) जोसे ग्राझियानो डी सिल्वा          २)युनेस्को क) इरिना बोकोवा           ३)जागतिक आरोग्य संघटना ड) मागरीट चन           ४) आयएल ओचे अध्यक्ष ? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
20
पुढील विधाने विचारात घ्या. अ) महाराष्ट्रातील ऊसाचा पिकाचा परिपक्कता काळ १४ महिन्यांपर्यंत आहे. ब) महाराष्ट्राचा ऊसाचा लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीत देशात मध्य प्रदेशनंतर दुसरा क्रमांक लागतो. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
21
गोव्यामध्ये पार पडलेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या जाहीरनाम्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) दहशतवादाला आंतरराष्ट्रीय शांततेसाठीचा धोका मानून सदस्य देशांनी युनोच्या माध्यमातून यासंबंधीच्या व्यापक करार करण्याची गरज व्यक्त केली. ब)मजबूत,शाश्वत, संतुलित व सर्वसमावेशक वाढीचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय सर्व देशांनी घेतला.
प्रश्न
22
केंद्र सरकारच्या ‘प्रादेशिक संपर्क योजनेंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांना विमान वाहतुकीने जोडले जाणार आहे. त्यामध्ये देशीविदेशी भाविकांची वर्दळ असलेल्या राज्यातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात येणार आहे ?
प्रश्न
23
पुढील विधाने विचारात घ्या. अ) ‘ब्रिक्स’ देशांच्या एकत्रित अर्थव्यवस्थेचा आकार जागतिक अर्थव्यवस्थेच्या ४१ टक्के आहे . ब) ‘ब्रिक्स’ देशांमध्ये जगाच्या लोकसंख्येपैकी ४४ टक्के लोकसंख्या वास्तव्य करते. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
24
भारताच्या शेजारील दक्षिण आणि आग्नेय आशियामधील देशांच्या सहभागाने स्थापन झालेल्या ‘बिमस्टेक’ संघटनेमध्ये भारताबरोबर कोणत्या आग्नेय देशाचा समावेश होत नाही ?
प्रश्न
25
२०१७ मध्ये होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x