25 April 2024 10:54 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतात सर्वात जास्त अवयवदान ……… या राज्यात केले जाते.
प्रश्न
2
सन २०१८-१९ हे वर्षे ……… या भारतीय महान शास्त्रज्ञाचे जन्मशताब्दी वर्षे म्हणून साजरा केले जात आहे.
प्रश्न
3
खालील विधाने वाचा नी बरोबऱ विधान ओळखा.अ) भारतातील पहिली प्रवासी पंचतारांकित क्रुझ सेवा २० ऑक्टोंबर २०१८ रोजी सुरु झाली.ब) पहिली क्रुझ सेवा मुंबई ते गोवा यादरम्यान सुरु झाली.क) भारतातील पहिल्या पंचतारांकित क्रुझ चे नाव आंग्रीया क्रुझ असे आहे.
प्रश्न
4
खालील विधाने वाचा आणि चूक विधाने ओळखा.अ) जागतिक बॅंकेचे मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आहे.ब) जागतिक बॅंकेचे नेवे अध्यक्ष म्हणून अमेरिकेतील डेव्हिड मॉलपास हे ५ एप्रिल २०१९ रोजी बनले.क) जागतिक बँकेच्या अध्यक्षाची मुदत ५ वर्षे एवढी असते.ड) डेव्हिड मॉलपास हे जागतिक बॅंकेचे १३ वे अध्यक्ष बनले.इ) जागतिक बॅंकेचे १२ वे अध्यक्ष डॉ. जिम यॉंग किम हे होते.
प्रश्न
5
खालीलपैकी बरोबर विधान कोणते?अ) दलिबिरसिंग सुहाग हे भारताचे सन २०१४ ते २०१६ या दरम्यान भारताचे लष्कर प्रमुख होते.ब) माजी लष्करप्रमुख दलिबिरसिंग सुहाग यांची भारताचे सेशेल्स देशातील उचायुक्त म्हणून नियुक्ती भारत सरकारने २५ एप्रिल २०१९ रोजी केली.
प्रश्न
6
खालील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा.अ) जागतिक बँकेच्या जुलै २०१८ च्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील ६ व्या क्रमांकाची बनली आहे.ब) जगात भारत फ्रान्सला मागे टाकून जगातील ६ वी अर्थव्यवस्था बनला आहे.क) जगातील अनुक्रमे पहिल्या पाच अर्थव्यवस्था अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, इंग्लंड या देशाच्या आहेत.
प्रश्न
7
भारत सरकारच्या सन २०१९ च्या व्यसनाधीनता अहवालानुसार सर्वाधिक दारूचे व्यसन किवा सेवन करणारी अनुक्रमे राज्य कोणती?
प्रश्न
8
अ) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना टप्पा पहिल्याची घोषणा १ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या केंद्रीय हंगामी अर्थसंकल्पात करण्यात आली.ब) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून ५ एकर पेक्षा कमी जमीन असण्याऱ्या शेतकऱ्यांना प्रती महिना ५०० रुपये अनुदान मिळते.क) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून वर्षात २ टप्प्यात ६००० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.वरील विधाने वाचा आणि यापैकी चूक विधान ओळखा.
प्रश्न
9
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.अ) सन २०१८ चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार अभिनेते विनोद खन्ना यांना देण्यात आला.ब) विनोद खन्ना यांना हा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.क) सन २०१८ चा ६५ व सर्वोकृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रीदेवी यांना देण्यात आला.ड) श्रीदेवी यांना मॉंम चित्रपटातील भूमिकेसाठी मरणोत्तर राष्ट्रीय चित्रपट सर्वोकृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
10
खालील विधाने वाचा आणि चूक विधान ओळखा.अ) आंतरराष्ट्रीय पोलीस संस्था म्हणून इंटरपोल हि संस्था कार्य करते आहे.ब) इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्स देशातील पॅरिस येहते आहे.
प्रश्न
11
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कर विषयी कोणते विधान बरोबर आहे?अ) हा पुरस्कार भारत सरकारच्या कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च कडून दिला जातो.ब) डॉ. शांतीस्वरूप भटनागर हे CSIR चे संस्थापक संचालक होते.क) हा पुरस्कार सन १९५८ पासून ४५ वर्षांच्या आतील भारतीय तरुण शास्त्रज्ञाना दिला जातो.ड) ५ लाख रुपये, मानपत्र आणि वयाच्या ६५ वर्षापर्यंत १५००० रुपये प्रतिमहिना मानधन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रश्न
12
खालील विधाने वाचा अयोग्य पर्याय ओळखा.अ) मोदी सरकारने १ जानेवारी २०१५ रोजी नीती आयोगाची स्थापना केली.ब) नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार हे आहेत.क) केंद्रीय नियोजन आयोग रद्द करून त्या जागेवर नीती आयोगाची स्थापना करण्यात आली.ड) नीती आयोगाचे सचिव अमिताभ कांत हे आहेत.
प्रश्न
13
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.अ) बंधन रेल्वे एक्सप्रेस हि भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान धावते.ब) बंधन रेल्वे एक्स्प्रेस भारतातील कोलकत्ता ते बांगलादेशातील खुलना या दोन शहरादरम्यान धावते.क) बंधन रेल्वे एक्सप्रेस नोव्हेंबर २०१७ पासून सुरु करण्यात आली.
प्रश्न
14
खालील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा.अ) ५ जून २०१८ रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम होती – प्लास्टिक प्रदूषणावर मात.ब) ५ जून २०१८ रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश भारत होता.क) ११ जुलै २०१८ रोजीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम होती -कुटुंब नियोजन हा मानवी हक्क आहे.ड) ७ एप्रिल २०१८ रोजीच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना होती – सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती : सर्वांसाठी आरोग्य
प्रश्न
15
खालील विधाने वाचा आणि चुक विधान ओळखा.अ) सन २०१९ हे वर्ष भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याचे ७० वे वर्ष म्हणून साजरा केले जात आहे.ब) इंडोनेशिया व भारत सरकारच्या ७० वर्ष राजनैतिक संबंधानिमित्य इंडोनेशिया सरकारने विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले आहे.क) भारताचे इंडोनेशियातील उच्चायुक्त श्री प्रदीपकुमार रावत हे आहेत.
प्रश्न
16
अयोग्य विधान निवडा.अ) भारतातील पहिले सेमी हायस्पीड रेल्वे दिल्ली ते वाराणसी या शहरादरम्यान सुरु झाली.ब) भारतातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन चे नाव वंदे मातरम रेल्वे एक्सप्रेस आहे.क) भारत सरकारने ट्रेन १८ चे नामकरण वंदे मातरम रेल्वे एक्सप्रेस असे केले आहे.ड) वंदे मातरम रेल्वेची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये करण्यात आली.
प्रश्न
17
खालील विधाने वाचा.विधान अ) सन १९८४ साली अवकाशात प्रवास केलेले पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा आहेत.विधान ब) भारताने नियोजित केलेल्या पहिल्या अवकाश मोहिमेचे म्हणजे गगनयान मोहिमेचे सल्लागार राकेश शर्मा हे आहेत.
प्रश्न
18
खालील विधाने वाचा आणि अचूक विधाने ओळखा.अ) १०६ वे इंडियन सायन्स कॉंग्रेस सन २०१९ चे अधिवेशन जालंधर येथे केले होते.ब) १०६ वे इंडियन सायन्स चे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मनोज कुमार चक्रवती हे होते.क) पहिल्या इंडियन सायन्स कॉंग्रेस आयोजन सन १९१४ साली कोलकत्ता येथे केले होते.ड) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय जवान , जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान अशी घोषणा १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये केली.
प्रश्न
19
खालील विधाने वाचा आणि अयोग्य विधान निवडा.अ) सोलापूर विद्यापीठाचे नवे नामकरण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असे आकरण्यात आले.ब) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचा सध्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या आहेत.क) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ हे देशात फक्त एका जिल्ह्यासाठी असणारे पहिले विद्यापीठ आहे.ड) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील चौंढी येथे झाला आहे.
प्रश्न
20
खालील विधाने वाचा आणि अचूक विधाने ओळखा.अ) २६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सिरील रामफोसा हे राष्ट्राध्यक्ष होते.ब) सिरीया रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत.क) २६ जानेवारी २०१९ रोजीच्या पथसंचालनात महाराष्ट्राचा छोडो भारत आंदोलनाचा इतिहास दाखवणारा चित्ररथ सहभागी झाला होता.
प्रश्न
21
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्यावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी ……… हि समिती सन २०१८ मध्ये स्थापन केली आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्र सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बॅसिडर म्हणून ……… यांची निवड केली.
प्रश्न
23
१७ व्या लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात निवडणूक सदिच्छादुत म्हणून जाहीर करण्यात आलेली तृतीयपंथी …….. आहे.
प्रश्न
24
खालील विधाने वाचा आणि अचूक पर्याय निवडा.अ) वस्तू व सेवा कर भारतात १ जुलै २०१६ पासून लागू करण्यात आला.ब) वस्तू व सेवा कर विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य आसाम हे आहे तर महाराष्ट्र हे १० वे राज्य आहे.क) एक राष्ट्र, एक कर, एक बाजार हे घोषवाक्य वस्तू व सेवा कर या कार्प्रनालीचे आहे.ड) वस्तू व सेवा कर या विषयी घटना दुरुस्ती १०१ वी आहे तर १२२ वे घटनादुरुस्ती विधेयक आहे.
प्रश्न
25
खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.अ) कर्नाटक कॉंग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.ब) कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे आहेत.क) प्रमोद सावंत हे गोवा राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.ड) मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ बनले आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x