14 May 2021 10:44 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.अ) भारताचे पहिले लोकपाल म्हणून माजी न्या. पिनाकीचंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आली.ब) लोकपाल हा देशाचा सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश असावा लागतो.क) लोकपाल व सदस्य यांचे नियुक्ती वेळी किमान वय ४५ वर्षे असावे आणि ते नियुक्तीनंतर ५ वर्षे किंवा वयाच्या ७० वर्षापर्यंत पदावर राहू शकतात.ड) लोकपाल व सदस्यांना प्रती महिना वेतन देशाच्या सर न्यायाधीशाइतके असते.
प्रश्न
2
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.अ) भष्ट्राचार विरोधी जनांदोलन समितीची स्थापना अण्णा हजारे यांनी केली आहे.ब) अण्णा हजारे यांचे मूळ गाव राळेगण सिद्धी ता. पारनेर जि. अहमदनगर हे आहे.क) अण्णा हजारे यांचे मूळ नाव किसान बाबुराव हजारे हे आहे.ड) अण्णा हजारे यांनी २० वे उपोषण राळेगण सिद्धी येथे लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी सरकार विरोधात ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५ दरम्यान केले.
प्रश्न
3
विधान अ – १९७१ च्या भारत व पाकिस्तान  युद्धाच्या विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाले.विधान ब – बोर्डर हा हिंदी चित्रपट कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या युद्धातील कामगिरीवर आधारित होता.
प्रश्न
4
मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉरमेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट या पुस्तकाचे लेखक ………. आहेत.
प्रश्न
5
खालील विधाने वाचा.विधान अ – राज कुमार बडजात्या यांचे फेब्रुवारी २०१९ मध्ये निधन झाले.विधान ब – राजश्री प्रोडक्शन निर्मिती संस्थेतर्फे कौटुंबिक प्रतिमा तयार करणारे मैने प्यार किया आणि हम साथ साथ है या चित्रपटाची निर्मिती राजकुमार बडजात्या यांनी केली.
प्रश्न
6
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.अ) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७६ व्या बटालियनच्या ताफ्यावर दहशदवादी हल्ला करण्यात आला.ब) पुलवामा दहशदवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले.क) पुलवामा दहशदवादी हल्ला पाकिस्तानमधील जैश-ए-महंमद या दहशदवादी संघटनेने केला होता.ड) पुलवामा दहशदवादी हल्ल्याचा बदल म्हणून २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील जैश-ए-महंमदच्या दहशदवादी छावण्यावर हवाई हल्ले केले होते.
प्रश्न
7
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय ओळखा.अ) कादरखान यांचे ३१ डिसेंबर २०१८ रोजी कॅनडात निधन झाले.ब) कादरखान हे प्रसिध्द पटकथाकार संवाद लेखक तसेच विनोदी अभिनेते होते.क) बेस्ट कॉमेडीयन म्हणून कादरखान यांना ३ वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.ड) भारत सरकारने कादरखान यांना सन २०१९ चा पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर दिला होता.
प्रश्न
8
भारत सरकारकडून सन २०१९ साली भारतरत्न पुरस्कार ……….. या ३ व्यक्तींना देण्यात आला आहे.
प्रश्न
9
व्हिडिओकॉन उद्योग समूहाला आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चांद कोचर यांनी ३२५० कोटी रुपयांचे कर्ज वसूल केले होते या कर्ज प्रकरणीची चौकशी करण्यासाठी आयसीआयसीआय बॅंकेने ………. समिती स्थापन केली होती.
प्रश्न
10
खालील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा.अ) भारताचे पहिले अवकाशवीर राकेश शर्मा आहेत.ब) भारताच्या गगनयान मोहिमेचे सल्लागार राकेश शर्मा आहेत.क) गगनयान अवकाश मोहिमेत ३ भारतीय अंतराळवीर सन २०२२ साली पाठवले जाणार आहेत.ड) गगनयान अवकाश मोहीम हि जीएसएलव्ही-मार्क-३ यानाद्वारे सोडली जाणार आहे.
प्रश्न
11
खालील विधानापैकी अचूक विधान/विधाने कोणते आहे/आहेत?अ) भारतातील पहिला डबलडेकर बोगीबील पुल आसाम राज्यात उभारण्यात आला आहे.ब) बोगीबील डबलडेकर पूल हा ४.९४ कि. मी. लांबीचा पूल ब्रह्मपुत्रा नदीवर उभारण्यात आला आहे.क) बोगीबील डबलडेकर पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०१८ रोजी केले.ड) बोगीबील हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लांबीचा पूल आहे.
प्रश्न
12
विधान अ – समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश नेदरलँड्स हा आहे.विधान ब -समलैंगिक विवाहाला सर्वोच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर २०१८ रोजी मान्यता दिली. हि मान्यता देणारा भारत हा जगातील २६ व देश ठरला आहे.
प्रश्न
13
२६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजाकासत्ताक दिन सोहळ्याच्या संचालनात प्रथम क्रमांक मिळालेला चित्ररथ …….. आहे.
प्रश्न
14
खालील विधाने वाचून अचूक विधान ओळखा.
प्रश्न
15
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.अ) मणिपूर राज्य सरकारने पर्यटन वाढीसाठी २०१८ पासून संगाई महोत्सव सुरु केला आहे.ब) मणिपूरचा राज्य प्राणी संगाई हरीण आहे.क) महाराष्ट्र राज्य प्राणी शकरु खार आहे.ड) बिहू हा उत्सव आसाम राज्यात साजरा केला जातो.
प्रश्न
16
फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक करणारे अनुक्रमे देश कोणते आहेत?
प्रश्न
17
खालील विधाने वाचा आणि बरोबर पर्याय निवडा.अ) सन २०१९ साली देशात १७ व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली.ब) लोकसभा निवडणुकीबरोबर सन २०१९ साली सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या चार राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या आहेत.क) ओडीसा विधानसभेची सन २०१९ मध्ये १६ वि निवडणूक संपन्न झाली.ड) ओडीशाचे सलग पाचव्यांदा नवे मुख्यमंत्री नवीन पटनाईक बनले आहेत.
प्रश्न
18
विधान अ – नीती आयोगाने देशातील आकांक्षित जिल्ह्याची एकूण संख्या १११ जाहीर केली आहे.विधान ब – नीती आयोगाने आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली व बीड या ५ जिल्ह्यांचा समावेश केला आहे.
प्रश्न
19
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये कोरकू आदिवासी जमातीतील लोकांना आरोग्य सेवा देणारे समाजसेवक दाम्पत्य डॉ. अमोल कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना ……….. हा पुरस्कार केंद्र सरकारने २०१९ मध्ये प्रधान केला आहे.
प्रश्न
20
खालीलपैकी कोणते अयोग्य विधान नाही?
प्रश्न
21
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.अ) १३ एप्रिल २०१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाली.ब) जालियनवाला बाग हुतात्मा स्मारक अमृतसर येथे आहे.क) जालियनवाला बाग हत्याकांडावेळी पंजाब प्रांताचा गव्हर्नर जनरल मायकेल ओडवायर हा होता.ड) जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखीच्या दिवशी जमलेल्या सभेतील लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश जनरल डायरने दिला होता.
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा १४ मार्च २०१८ रोजी …….. या देशाने केली.
प्रश्न
23
जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांचा योग्य अनुक्रमे क्रम लावा.अ) चिनीब) स्पॅनिशक) इंग्रजीड) हिंदीइ) बंगालीई) पोर्तुगीजफ) अरबी
प्रश्न
24
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.अ) एमटीसीआर म्हणजे मिसाईल टेक्रॉलॉंजी कंट्रोल रेजिम होय.ब) एमटीसीआर संघटनेची स्थापना १९८७ साली जगातील रासायनिक, जैविक व आण्विक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली.क) २७ जून २०१६ पासून एमटीसीआर संघटनेचा भारत हा ३५ अधिकृत सदस्य बनला आहे.ड) एमटीसीआर संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे.
प्रश्न
25
खालील विधाने वाचा आणि अयोग्य विधान कोणते?अ) सन २०१९ चे १५ वे प्रवासी भारतीय संमेलन वाराणसी येथे आयोजित केले होते.ब) पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातून सलग २ वेळा निवडून आले आहेत.क) १५ व्या प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे मॉंरिशसचे राष्ट्राध्यक्ष प्रविंदा जगन्नाथ हे होते.ड) वाराणसी येथील प्रवासी भारतीय दिनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x