14 May 2021 10:44 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-94

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य पर्याय निवडा.अ) रायगड जिल्ह्यातील रोहा हे रासायनिक उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते.ब) रोहा या ठिकाणी २०१९ च्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले.
प्रश्न
2
योग्य पर्याय निवडा.अ) राष्ट्रीय मतदार दिवस जानेवारी महिन्यात साजरा केला जातो.ब) हा दिवस २०११ पासून साजरा केला जात आहे.क) ‘कम टुगेदर फॉर २०१९ इलेक्शन’ ही २०१९ च्या मतदार दिनाची संकल्पना आहे.
प्रश्न
3
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली होती, यावेळी पाकिस्तानकडून कोणी शरणागती पत्रावर स्वाक्षरी केली होती?
प्रश्न
4
संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रात भारतास स्वयंपूर्ण बनविण्यासाठी तसेच स्वदेशी संरक्षण उद्योग क्षेत्रात बौद्धिक संपदा अधिकार (IPR) संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण विभागाने कोणती मोहीम सुरु केली आहे?
प्रश्न
5
भारताच्या सर्वात अवजड ठरलेल्या जीसॅट – ११ उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याने कोणत्या क्षेत्राला लाभ होणार आहे?
प्रश्न
6
योग्य पर्याय निवडा.अ) महाराष्ट्राने आपले वस्त्रोद्योग धोरण २०१८ यावर्षी जाहीर केले.ब) हे धोरण पाच वर्षासाठी लागू असणार आहे.
प्रश्न
7
पणजी येथे पार पडलेल्या ४९ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये मनाचा सुवर्ण मयूर पुरस्कार …… या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
8
अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर भारतातील १० टक्के प्राण्यांचा प्रजातींचा अधिवास आढळत असला तरी या क्षेत्राचे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रातील वाटा ……. इतका आहे.
प्रश्न
9
संयुक्त राष्ट्रे संघटनेमार्फत २०१८ मध्ये सक्रियतेत १६ दिवस ही मोहीम कोणत्या हेतूने राबविली गेली होती?
प्रश्न
10
१० वा ‘इंद्र नेव्ही सराव’ डिसेंबर २०१८ मध्ये कोठे पार पडला?
प्रश्न
11
भारतातील कोणती महत्वाची संस्था आदित्यात् जायते वृष्टिः या घोषवाक्याखाली कार्यरत आहे?
प्रश्न
12
देशातील सायबर-भौतिक प्रणाली आणि तिच्याशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतुने केंद्र सरकारने कोणते अभियान सुरु केले आहे?
प्रश्न
13
पहिली ‘बिटिंग रीट्रीट सेरेमनी’ कोणत्या वर्षी आयोजित केली गेली?
प्रश्न
14
भारताची निवडणूक आयोगासंदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) आयोगाची स्थापना १९५० साली झाली.ब) सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.क) निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था नाही.
प्रश्न
15
जी – २० च्या गटाच्या एका उपगटामध्ये भारताबरोबर खालीलपैकी अन्य कोणत्या देशाचा समावेश करण्यात आलेला नाही?
प्रश्न
16
योजना आयोगाच्या भारतीय ऊर्जा सुरक्षा चित्रस्थिती, २०४७ नुसार,अ) २०४७ पर्यंत भारत १६,९९८ टेरावॅट अवर इतकी ऊर्जा आयात करेल.ब) बांधकाम क्षेत्रात आयातीत इंधनावरील अवलंबित्व वाहतूक क्षेत्रापेक्षा जास्त राहील.क) २०३० पर्यंत भारत ६७ टक्के उर्जेची गरज आयातीत इंधनातून भागवेल.
प्रश्न
17
काकाडू – २०१८ या सागरी सरावात भारतासह कोणता देश सहभागी होता?
प्रश्न
18
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.अ) किम जोंग-यंग अध्यक्ष असलेल्या इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्स]मध्ये स्थित आहे.ब) ही संघटना फ्रेंच पोलीसदलातील सर्वात महत्त्वाची शाखा मानली जाते.
प्रश्न
19
‘कोकण’ या संयुक्त नौदल सरावाचे आयोजन कोणत्या वर्षापासून केले जात आहे?
प्रश्न
20
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो या संस्थेला आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार मिळाला आहे. ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी असलेल्या आपल्या कार्यालयातून कारभार पाहते?
प्रश्न
21
श्रमशक्तीमध्ये आढळणारी लिंग असमानता २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करण्याचे जी – २० गटाने निश्चित केलेले आहे?
प्रश्न
22
भ्रष्टाचारासंबंधी ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स – २०१८’ संदर्भात विधाने विचारात घ्या.अ) डेन्मार्क हा जगातील सर्वाधिक पारदर्शक व्यवहार असणारा देश आहे.ब) सोमालिया हा जगातील सर्वाधिक भ्रष्ट देश आहे.
प्रश्न
23
जगातील १०० प्रेरणादायी महिलांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणाचा नुकताच समावेश करण्यात आला आहे?
प्रश्न
24
भारताने अलीकडेच हायसीस या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या हेतूसाठी केले आहे?
प्रश्न
25
नासाचे ओरीसीस-आरईएक्स हे अवकाशयान आपल्या गंतव्य स्थानी, बेन्नू या लघुग्रहाजवळ पोहचले आहे. हा लघुग्रह कोणत्या समूहात स्थित आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x