20 April 2024 6:52 PM
अँप डाउनलोड

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सायंकाळी ०५.३० वा. अब्दुलने शाळेतून सूर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली ४ कि.मी. नंतर उजवीकडे वळून ३ कि.मी. चालून घरी पोहचला तर शाळेपासून घराचे अंतर किती?
प्रश्न
2
खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा?
प्रश्न
3
लेखक : लेखणी :: चित्रकार : ?
प्रश्न
4
शब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढीलप्रमाणेअ) शब्दयोगी अव्यय हा विकारी अव्यय आहेब) शुद्ध शब्दयोगी अव्यायामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो.क) शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात.ड) ‘च’, ‘मात्र’, ‘ना’ हि स्थलवाचक आहेत.वरील विधानातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा
प्रश्न
5
सर्वात मोठ्या चार अंकी संख्येस 12, 15, 18, 27 या संख्येने संपूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती?
प्रश्न
6
गटामध्ये  न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
7
पती, पत्नी व ५ वर्षाच्या मुलाचे वयाची सरासरी २१ वर्षे आहेत, तर ५ वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय २ वर्ष आहे, तर सद्य स्थितीत या परिवाराची वयाची सरासरी किती?
प्रश्न
8
‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
प्रश्न
9
एका पेरूची किंमत ५ रु., एका आंब्याची किंमत ७ रु. होती, वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्यासाठी एकूण ३८ रु. खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?
प्रश्न
10
महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?
प्रश्न
11
सन २०१७ मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या?
प्रश्न
12
X या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 हि संख्या मिळवली असता X हीच संख्या मिळते, तर X = ?
प्रश्न
13
‘मी पत्र लिहित असेन’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
14
WhatsApp  चा निर्माता कोण आहे?
प्रश्न
15
भारतचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषविलेली व्यक्ती कोण?
प्रश्न
16
‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
17
‘चाकूमुळे’ या शब्दातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
प्रश्न
18
‘माणूस जाते, त्याची किर्ती मागे उरते’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल?
प्रश्न
19
कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?
प्रश्न
20
आॅक्टोपस हे दहशदवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?
प्रश्न
21
जोडाक्षर म्हणजे काय?
प्रश्न
22
महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही?
प्रश्न
24
अव्ययाचा प्रकार सांगा : ‘तो वारंवार रजेवर असे’
प्रश्न
25
8, 12, 9, 13, 10, 14, 11 …, ….?
प्रश्न
26
एका मैदानात रविवारी सरासरी खेळाडूंची संख्या ५१० आहे, आठवड्यातील इतर दिवशी सरासरी २४० खेळाडू येतात, तर माहे एप्रिल २०१७ मध्ये सरासरी प्रत्येक दिवशी किती खेळाडू मैदानात येतील?
प्रश्न
27
गटामध्ये  न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
28
एका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?
प्रश्न
29
खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे?
प्रश्न
30
‘तो नेहमीच लवकर येत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
31
पुढील वाक्य ‘नवीन कर्मणी’ रुपात लिहा – ‘विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी’
प्रश्न
32
सन २०१६ रियो ऑंलिंपिकमध्ये भारताने एकूण किती पदक प्राप्त केले?
प्रश्न
33
खालील राज्यांचा पूर्व ते पश्चिम दिशेप्रमाणे योग्य तो क्रम लावावा.१) सिक्कीम २) त्रिपुरा ३) नागालैंड ४) झारखंड
प्रश्न
34
वर, खाली, पुढे, मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे?
प्रश्न
35
A स्थानकावरून B स्थानकाकडे जाणारी ११०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ५०कि.मी. वेगाने जाते. B स्थानकाकडून A स्थानकाकडे जाणारी १३०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ७० कि.मी. वेगाने जाते तर त्या आगगाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?
प्रश्न
36
‘ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?
प्रश्न
37
चल : अचल ::जड : ?
प्रश्न
38
एका पुस्तकविक्रेत्याने ३०० रु. किंमतीच्या ग्रंथावर २० टक्के सुट जाहीर केली. तर त्या ग्राहकांना किती पैसे मोजावे लागेल?
प्रश्न
39
खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही?अ)राजस्थान   ब)ओडीसा   क)त्रिपुरा   ड)मेघालय
प्रश्न
40
योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा : ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’, ‘की’ हि ……. आहेत.
प्रश्न
41
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
42
सन २०१७ मध्ये आतापर्यंत कोण कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या?
प्रश्न
43
संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये किती राज्ये आहेत?
प्रश्न
44
१६ संख्यांची सरासरी १९ आहे तर प्रत्येक संख्येस २ ने भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा.
प्रश्न
45
माझे वडील व त्यांचे तिघे भाऊ मिळून चौघेजण आहेत. या चौघांपैकी जो सर्वात धाकटा आहे, त्यास १ मुलगा व १ मुलगी आहे. त्याच्या पेक्षा जो थोरला आहे, त्यास २ मुलगे आहेत आणि त्याहून थोरल्यास २ मुलगे व तीन मुली आहेत. सर्वात थोरल्यास ३ मुलगे आहेत. थोडक्यात म्हणजे माझ्या वडिलांना ४ पुतण्या व ६ पुतणे आहेत. या सर्व माहितीचा विचार करता मला किती चुलत भाऊ असतील ते सांगा.
प्रश्न
46
“POLICE” या “QQOMHK” सांकेतिक भाषेत लिहल्यास “SIMPLE” हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
47
गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
48
१ ते १०० या अंकादरम्यान ९ अंक किती वेळा येतो?
प्रश्न
49
१. सर्व रस्ते घड्याळे आहेत. २. सर्व घड्याळे टेबल्स आहेत. तर…..
प्रश्न
50
महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा?
प्रश्न
51
खालील पर्यायातून क्रम लावा AZ, CX, FU, …..?
प्रश्न
52
एका समभूज चौकोणाचे कर्ण अनुक्रमे १५.६ से.मी. व ९.४ से.मी. लांबीचे आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
53
सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हि शब्द योगी अव्यय
प्रश्न
54
श्रीमान A आणि B भेटतात. B हे मुलगा C व मुलगी D चे वडील आहेत E हि A ची आई आहे. C चे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. E हे B ची सून आहे तर A हा नात्याने B चा कोण?
प्रश्न
55
‘चढ’ या क्रियापदास लिंग, वचन व पुरुष यांच्या झालेल्या विकारांचा गट शोधा
प्रश्न
56
एका वर्गातील ७५ विद्यार्थ्याचे सरासरी वय ७ वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय ७.५ वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती?
प्रश्न
57
खालील संख्यामालिकेत गाळलेली संख्या कोणती?5, 13, 25, 41, …..,85, 113, 145
प्रश्न
58
रवीच्या घरी गायी आणि कोंबड्या आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या ४८ आणि एकूण पायांची संख्या १४० तर यात आणखी १० कोंबड्या आणल्यास रवीच्या घरी एकूण किती कोंबड्या होतील?
प्रश्न
59
त्रिवेणीने एका बँकेकडून द.सा.द.शे. १० टक्के दराने ६०० रु. ३ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर मुदतीअखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल?
प्रश्न
60
काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवस लावतात, जर कामगारांची संख्या दुप्पट केल्यास एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
61
सकाळी ०९.१५ वाजता : १८० असल्यास सायंकाळी ९.३० वाजता : ….?
प्रश्न
62
श्ब्दाप्रकार सांगा : आयोग
प्रश्न
63
एक पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे.पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी २ तास लागतात तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी ६ तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ अगेल?
प्रश्न
64
17, 289, 255 : 27, 729 ……?
प्रश्न
65
‘जगन्नाथ’ शब्दाचा विग्रह असा होईल.
प्रश्न
66
दिपा कर्मारकर यांनी रियो ऑंलिंपिकमध्ये केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणती?
प्रश्न
67
एका बॅट्समनने ११० धावा काढल्या त्यापैकी ३ चौकार आणि ८ षटके होते, तर धावून काढलेल्या धावांची संख्येची टक्केवारी किती?
प्रश्न
68
1, 3, 5, 7, 11, ……?
प्रश्न
69
भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही?
प्रश्न
70
मराठीतील ‘लिंग व्यवस्थेबद्दल’ पुढीप्रमाणे विचार मांडता येतील.जसे – अ) मराठीतील लिंग व्यवस्था हि अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे.ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जेते.क) प्राणी मात्रांचे लिंग वास्तविक असे नसते.ड) निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक नसते.वरील विधानांचे पर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा.
प्रश्न
71
भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे?
प्रश्न
72
स्वतंत्र भारतचे पहिले वैयक्तिक आॅलम्पीक पदक मिळवणारी व्यक्ती कोण?
प्रश्न
73
कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा?
प्रश्न
74
एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, “तुझ्या भावाची बहिण माझी आई आहे” तर त्याची आई त्या स्त्रीची कोण?
प्रश्न
75
रिकाम्या जागा भरा? V, VIII, XI, XIV, ….., XX
प्रश्न
76
‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशाप्रकारे होईल?
प्रश्न
77
एका परीक्षाकेंद्रात एका वर्गामध्ये ७ रांगा आहेत असे एकूण ३ वर्ग आहेत. एका रांगेत २५ विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी २ शिक्षक आणि एका वर्गासाठी एक परीवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परीक्षाकेंद्रात एकूण किती लोक उपस्थित आहेत?
प्रश्न
78
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
79
खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.
प्रश्न
80
सर्वनामाचे एकूण किती मुख्य प्रकार आहेत?
प्रश्न
81
“जोसेफ मॅझिनी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
82
गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
83
भारतात सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणता?
प्रश्न
84
खालीलपैकी योग्यप्र्याय निवडा :3/4, 5/8, 7/12, 16/29, 13/16
प्रश्न
85
एक दुधवाला दुधामध्ये ८० टक्के भेसळ करतो. या दुधावाल्याकडून ८० लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर शुध्द दुध मिळेल?
प्रश्न
86
१५ आॅगस्ट १९४७ रोजी कोणता वार होता?
प्रश्न
87
नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत?
प्रश्न
88
QPO, NML, KJI, ……, EDC ?
प्रश्न
89
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आणि त्यांच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे?
प्रश्न
90
गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
91
OE1, NG3, ….LK7?रिकाम्या जागेवर येणारा शब्द हा जगातील कोणत्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचा नाव आहे?
प्रश्न
92
‘तु फार चतुर आहेस’ हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
प्रश्न
93
खालीलपैकी कोणी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले?
प्रश्न
94
एका आयताकृती शेताचे क्षेत्रफळ ४६० चौ.मी. आहे. जर त्याची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा १५ टक्क्याने जास्त आहे, तर त्या शेतास ताराचे कुंपण ५० रुपये प्रती मीटर या भावात करावयाचे असल्यास किती खर्च येईल?
प्रश्न
95
खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र सैन्य दलातील पंच तारांकित अधिकारी नाही?
प्रश्न
96
सार्क परिषदेच्या बैठकीसाठी इस्लामाबाद येथे ७ देशाचे प्रमुख आले होते. त्या वेळी प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले, त्या वेळेस राष्ट्रप्रमुखांमध्ये एकूण किती हस्तांदोलने झाली?
प्रश्न
97
निलेशने एक घड्याळ विकल्यास २५ टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरीदाराने निलेशन ला ५०० रु. ची नोट दिल्यानंतर निलेशने बाकी १२५ रु परत केले, तर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली?
प्रश्न
98
एका संख्येच्या ५० टक्क्यामधून ५० वजा केले असता बाकी ५० उरते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
99
पुढील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा : हंस
प्रश्न
100
एका भ्रमणध्वनीची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर २ तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची ३ टक्के बॅटरी शिल्लक असल्यास किती वेळ बोलू शकेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x