14 December 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

'A फॉर'? सगळ्या विकृतींचं नाव एकच! नितेश राणेंना म्हणायचंय तरी काय? कारण योगी आदित्यनाथ, अमित शहा??

BJP MLA Nitesh Rane

BJP MLA Nitesh Rane | नागपूर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की, महाराष्ट्रात इतके राजकारणी आहेत, पण जेव्हा जेव्हा सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियनचा प्रश्न येतो. मुद्दा काढला जातो, तेव्हा फक्त आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं जातं? तेव्हा दुसऱ्या राजकारण्याचं नाव का घेतलं जात नाही? का उल्लेख केला जात नाही. दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाहीये का? कुठे न कुठे दाल में कुछ काला हे म्हणून तर एकाच माणसाचं सातत्यानं नाव घेतलं जातं.

भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्याकडून सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. “A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच!”, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.

“A फॉर” वरून नेटिझन्सकडून नितेश राणेंची खिल्ली :
दरम्यान, आमदार नितेश राणे यांची याच वक्तव्यावरून खिल्ली उडवली जातेय. नेटिझन्स “A फॉर” अमित शहा आणि “A फॉर” योगी आदित्यनाथ असे फोटो ट्विट करत भाजपाची खिल्ली उडवत आहेत. त्यामुळे जोशमध्ये केलेलं वक्तव्य नितेश राणे यांच्यावर पालटलं आहे आणि पुढे विरोधक त्याचाच धागा पकडून टीका करतील अशी शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP MLA Nitesh Rane troll by Netizens on social Media check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

#BJP MLA Nitesh Rane(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x