19 April 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

मुख्यमंत्री सीमावादावर ब्र देखील काढत नाही, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करा, उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thakceray

Uddhav Thackeray | आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अपेक्षेप्रमाणे आज विरोधकांकडून सभागृहात महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावर सभागृहात उद्धव ठाकरे बोलत आहेत. सीमावादाच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे, भाजप सरकारला जोरदार टोला लगावला. सीमावर्ती भागात मराठी माणसांवर अत्याचार सुरू आहे. जेव्हा तेथील ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात जाण्याचा ठराव संमत केला तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्या ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या. देशात काय मोगलाई आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी सीमावादावरून एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे.

याचविषयी आज विधीमंडळात प्रस्ताव मांडण्यात आला. याच प्रस्तावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण करत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणारा भाग हा केंद्रशासित करावा अशी मागणी विधानपरिषदेत केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत
मुख्यमंत्री सीमावादावर ब्र देखील काढत नाही. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत या सगळ्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्र शासित करावा. अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

शिंदे गटाच्या आमदारांना टोला
आम्हीही सीमावाद प्रश्नी लाठ्याकाठ्या खाल्ल्या होत्या, असं शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं होतं. त्याचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. तुम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता सीमापार गेला. आता तिकडे गेला म्हणून बोलायचं नाही असं नाही. तेव्हा लाठ्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसायचं असं काही नाही, असा चिमटा काढतानाच किती काळ मराठी माणसाने लाठ्या खायच्या? किती काळ फक्त या विषयावर चर्चा करणार आहोत? असा सवाल त्यांनी केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Chief Uddhav Thackeray attack on Shinde Government over Maharashtra Karnatak Border issue check details on 26 December 2022.

हॅशटॅग्स

Uddhav Thakceray(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x