23 September 2019 11:06 AM
अँप डाउनलोड

धुळ्यात भाजपचे चंद्रकांत सोनार महापौरपदी विराजमान

धुळे : धुळे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची वर्णी लागली आहे. महानगरपालिका निवडणुकीत एकूण ७४ जागांपैकी भाजपने ५० जागांवर घवघवीत यश प्राप्त केलं होतं. त्यामुळे अन्य कुणाची सुद्धा मदत न घेता भारतीय जनता पक्षाने स्वबळावर धुळे महानगर पालिकेत सत्ता स्थापन केली.

तसेच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत, विकास निधी समान वाटपाची अपेक्षा व्यक्त करत एनसीपी आणि काँग्रेसच्या उमेदवार मंगला चौधरी यांनी त्यांचा महापौर पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर आघाडीच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराने सुद्धा त्याचा अर्ज मागे घेतल्याचं घोषित केले.

भाजपा नंतर एनसीपीचे सर्वाधिक म्हणजे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून या निवडणुकीत मंगल चौधरी यांना महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी खान सद्दीम हुसेन यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलं होतं. परंतु ते सर्व निष्फळ ठरलं आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(222)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या