20 April 2024 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

BJP MP Gopal Shetty | भाजप खासदार गोपाळ शेट्टींच्या राजीनामा देण्याचा इशाऱ्यानंतर फडणवीस पोहोचले भेटीला

BJP MP Gopal Shetty

मुंबई, २८ सप्टेंबर | सन 2022 पर्यंत प्रत्येक देशवासीयांना घरे हे तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न आहे. गरीबांना हक्काचे पक्के घर देणे हाच भाजपाचा (BJP MP Gopal Shetty) ध्यास आहे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 27) केले.

Opposition leader Devendra Fadnavis had  meeting with BJP MP Gopal Shetty, BJP MP From North Mumbai :

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे गरीब, झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या हक्काची घरे मिळू शकत नाहीत. या संदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही ठाकरे-पवार सरकार काम करण्यास तयार नाही. याच्या निषेधार्थ भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी संसदीस समित्यांचा राजीनामा तर दिलाच. शिवाय येत्या फेब्रुवारीपर्यंत ठाकरे-पवार सरकारने निर्णन न घेतल्यास खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एसआरए (झोपडपट्टी विकास प्राधिकरण) नियमांमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेला एसआरए कायदा लागू करावा, पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना पक्के घर मिळावे यासाठी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतल्या सहाही विधानसभा मतदार संघात गणेशोत्सवात आंदोलन केले होते. या संदर्भात फडणवीस यांनी शेट्टी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

फडणवीस म्हणाले, ”खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चाललेल्या आंदोलनाला माझा तसेच मुंबई भाजपाचा पूर्ण पाठिंबा आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासियांच्या हित रक्षणासाठी भाजपा वचनबद्ध आहे. गरीबांना हक्काचे पक्के घर मिळावे हा भाजपाचा तर ध्यास आहे.” फडणवीस यांनीच २०१५ मध्ये याबाबतचा शासनादेश काढला होता. त्यात म्हाडा, एसआरए, सिडको असा अंतर्भाव करण्यात आला. २०१७ मध्ये झोपडपट्टी नियमांमध्ये सुद्धा बदल करून २०१८ मध्ये जीआर काढून २०११ पर्यंतच्या अपात्र व्यक्तींना सुद्धा सशुल्क घर देण्याचा निर्णय झाला. केंद्राचे अडीच लाख रुपये आणि राज्याचे अडीच लाख रूपये असे मिळून पाच लाख रुपयांच्या आत त्यांनाही घर मिळावे, यासाठीची तरतूद करण्यात आली. तथापी आत्ताचे महाआघाडी सरकार पहिल्या माळ्यावरील झोपडीधारकांना वेळकाढूपणा करून त्यांना घर नाकारत आहे अशी सविस्तर माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: BJP MP Gopal Shetty resignation warning Devendra Fadnavis meet immediately.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x