15 December 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मेहबूब शेख यांना धक्का | बलात्कार प्रकरणातील अहवाल फेटाळत न्यायालयाचे पुन्हा तपास करण्याचे आदेश

NCP leader Mehboob Sheikh

मुंबई, 23 सप्टेंबर | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी अहवाल’ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. “या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला आहे. तसेच तक्रारदारालाच या प्रकरणात खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून या प्रकरणात आता सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपास करावा. त्यात पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे”, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

मेहबूब शेख याना धक्का, बलात्कार प्रकरणातील अहवाल फेटाळत न्यायालयाचे पुन्हा तपास करण्याचे आदेश – Court rejected the report of the police in the rape case against NCP leader Mehboob Sheikh :

बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला असून बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे आदेश देताना न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत. पाेलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आराेपी यांची भेट झाल्यावरही शंका उपस्थित केली हाेती. सीसीटीव्हीतही दाेघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पाेलिसांनी सांगितले हाेते. त्यावरून पाेलिसांकडून बी समरी अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून फेटाळला.

नेमकं काय आहे प्रकरण?
सहायक पाेलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी ॲड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध 28 डिसेंबर 2020 राेजी सिडकाे पाेलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. नाेकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून 14 नाेव्हेंबर 2020 राेजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, ताेंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आराेप मेहबूब शेख यांनी समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले हाेते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Court rejected the report of the police in the rape case against NCP leader Mehboob Sheikh.

हॅशटॅग्स

#MehboobSheikh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x