20 May 2022 10:19 AM
अँप डाउनलोड

सेनेचे सुभाष देसाई यांच्या विरोधात खडसेंचा हक्कभंग

मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा हक्कभंग नोटीस दिली असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भोसरी जमीन गैरव्यवहाराबाबत सरकारला चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप खडसेंनी नोंदविला आहे. त्यासाठी खडसेंनी विधानसभेत हक्कभंग मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपामुळे एकनाथ खडसेंना मंत्रिपद गमवावं लागलं होतं. परंतु उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भोसरी जमीन गैरव्यवहाराबाबत सरकारला चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप खडसेंनी नोंदविला आहे. त्यासाठीच खडसेंनी विधानसभेत हक्कभंग मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे.

एकनाथ खडसेंनी ९ जुलै २०१७ रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली होती. तीच नोटीस मला सभागृहात मांडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी सभागृहात केली आहे. मी भ्रष्टाचार केल्याचा केवळ कांगावा केला जातोय त्यामुळे खरं काय आणि खोटं काय ते लोकांसमोर यावं म्हणूनच मी ही विनंती सभागृहाला करत आहे असं खडसे म्हणाले.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x