विशेष रिपोर्ट- प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ही सेम असतं! सर्वकाही ठरवून?
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. परंतु, भाजप आणि शिवसेनेतील सर्व घडामोडींवर बारीक नजर टाकल्यास सर्वकाही २०१४ मधील लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठरवून सुरु आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे याच २०१४ मधील राजकीय रणनीतीप्रमाणे भाजप आणि शिवसेनेने निवडणुका लढवल्या होत्या आणि प्रसार माध्यमांना एकप्रकारे स्वतःवर केंद्रित करून अप्रत्यक्षरीत्या गंडवले होते, असंच म्हणावं लागेल.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास त्यावेळी शिवसेना आणि भाजप राज्यात एकत्र लोकसभा निवडणूक लढले होते. परंतु, सध्या एकत्र येणार नाहीत याची काहीच खात्री देता येणार नसली तरी, आणि स्वबळावर निवडणूक लढविल्या तरी रणनीती मात्र अगदी तशीच अवलंबिण्यात आली आहे. एका बाजूला राज्यात तुमचं आमचं जमेना होत असताना, भाजप अध्यक्ष देशभर ‘मराठे आणि मराठीचे’ म्हणजे पानिपतच्या लढाईचे दाखले देत आहेत. कारण उत्तर प्रदेशपाठोपाठ एनडीए’कडे ,महाराष्ट्रात एकूण ४१ जागा होत्या. परंतु, त्यातील राजू शेट्टी यांनी भाजपला सोडचिट्टी दिल्याने तो आकडा आज ४० वर आला आहे.
एनडीए’चा आज विचार केल्यास भाजपला अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घटक पक्षांनी सोडचिट्टी दिली आहे. केवळ रामविलास पासवान यांचा बिहारमधील लोक जनशक्ती पक्ष हे आजही मंत्रिपदासह जाहीरपणे भाजपसोबत एनडीए’चा घटक पक्ष आहेत. तसेच काही स्थानिक पक्ष आहेत, परंतु त्यांचं महत्व केवळ स्थानिक पातळीवर आहे आणि केंद्रात मंत्रिपदाशी त्यांचा काही संबंध नाही. दुसरीकडे, केवळ शिवसेना असा पक्ष आहे, जो ‘तुमचं आमचं जमेना’ असं सर्वकाही दाखवत असला तरी गल्ली ते दिल्ली मंत्रिपदं आणि महामंडळ गुण्यागोविंदाने उबवण्यात व्यस्त आहे. शिवसेना कितीही स्वबळाच्या घोषणा देत असली, तरी ते एनडीएला सोडचिट्टी देण्याची हिम्मत करताना दिसत नाहीत आणि हेच शिवसेनेच्या डोक्यातील योजना समजून घेण्यास पुरेसे आहे.
भाजपवर केवळ वर्तमान पत्रातून टीका करून, काही प्रमाणात छोट्या मोठ्या टिपण्यांव्यतिरिक्त शिवसेना नेत्यांकडून काहीच होताना दिसत नाही. भाजपने शिवसेनेला किती पटकण्याच्या बाता केल्या, तरी त्यांना एक गोष्ट चांगलीच ठेऊक आहे आणि ती म्हणजे शिवसेनेला ‘पटवणे’ अधिक सोपे आहे, त्यामुळे ते पटकण्यात अजिबात वेळ वाया घालवणार नाहीत. अगदी शिवसेना नैतृत्वाशी संबंधित सर्वकाही म्हणजे ‘मातोश्री -२’च्या ६ मजल्यांसाठी सीसी मुंबई महापालिकेनं दिलेला होता, कारण ते सत्ताधारी आहेत. उर्वरित २ मजल्यांसाठी परळ येथील एका SRA प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला. परंतु त्या व्यवहारावर मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ते प्रकरण थेट फडणवीसांकडे वर्ग केलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी या इमारतीला विशेष परवानगी दिली होती. तसेच स्वर्गीय. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून अनेक नियमांना बगल देत मदत सुरु आहे. अशा एक ना अनेक गोष्टींचा दाखला देता येईल.
यावरूनच भाजप आणि शिवसेनेत वरच्या थरातून खासगी संपर्क अभियान जोरात सुरु आहे असंच एकूण चित्र आहे. समाज माध्यमांवर देखील शिवसैनिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा मनसेवर अधिक केंद्रित असल्याचे दिसतात. त्यात भाजपवर कुणी टीका केल्यास भाजप समर्थकांपेक्षा शिवसैनिकच आधीक चवताळून उठतात हे सुद्धा समाज माध्यमांचा आढावा घेतल्यावर समजतं. त्यामुळे सर्वकाही कठीण असल्याचं चित्र आहे. २०१४ मधील भाजप आणि शिवसेनेच्या जाहिरातींचा आढावा घेतल्यास त्या जवळपास सारख्याच होत्या आणि दोन्ही पक्षांच्या काही जाहिरातींमध्ये तर पात्र सुद्धा तीच होती, यावरूनच यांच्यातील संवाद वरून किती होता याचा अंदाज येतो.
भाजपच्या जुमला जाहिरातींचा बोंबाटा तर शिवसेनेने नेहमीच केला. परंतु शिवसेनेच्या २०१४ मधील जाहिरातींचा मागोवा घेतल्यास ते भाजपपेक्षा काही वेगळे नव्हते असे लक्षात येईल. त्यामुळे सध्या ठरवून घेतलेल्या मुलाखती आणि निवडणुकीच्या तोंडावर मूळ मुद्यांना बगल देऊन, भावनिक साद घालण्यासाठी प्रदर्शित करण्यात येणारे सत्ताधारी स्पॉन्सर सिनेमे म्हणजे याच ठरलेल्या रणनीतीचा भाग आहेत. मोदींनी २०१४ नंतर जाहीर मुलाखत दिली नाही असा आरोप करण्यात आला आणि शिवसेनेने सुद्धा तो मुद्दा उचलला होता. त्यानंतर मोदींनी एएनआय’ला दिलेली मुलाखत ही पूर्वनियोजित होती, असा आरोप सुद्धा करण्यात आला. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी अनेक मुलाखती दिल्या, परंतु त्यांनी सुद्धा राम मंदिर आणि भावनिक विषयांवर जोर दिला. आज जर एखाद्या वहिनीला शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी काय विकास केला या विषयावर ते मुलाखत देऊ शकतील का? हा प्रश्नार्थक विषय आहे. कारण, शिवसेनेचे आमदार धानोरकर यांनी आधीच ते गुपित भर सभेत सांगितले आहे.
त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर ‘कार्य शिवसेनेचे’ या हॅश टॅगने रक्तदान शिबीर, स्थानिक रोजगार मेळावे आणि इतर सामाजिक कार्यांचे दाखले दिले जात आहेत. वास्तविक सत्ता ही रक्तदान शिबीर आणि रोजगार मेळावे आयोजित करण्यासाठी दिलेली नसते. तर राज्य आणि देश पातळीवरील प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि विकासाची कामं करण्यासाठी दिलेली असते. जर रक्तदान शिबीर, रोजगार मेळावे आणि इतर सामाजिक कार्य करण्यासाठी १२ मंत्रिपद पद मिळतात तर ती मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सुद्धा द्यावीत, कारण असे स्थानिक उपक्रम सर्वच पक्ष करत असतात आणि त्यामागील मूळ कारण असत स्थानिक पक्ष बांधणी.
त्यामुळे राज्यातील भाजप आणि शिवसेनेने प्रसार माध्यमांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अवलंबलेली रणनीती म्हणजे २०१४मधील रणनीतीचा पुढचा अध्याय आहे आणि त्या सापळ्यात स्वतःला हुशार समजणारी प्रसार माध्यमं अडकणार? की लोकशाहीत महत्वाचा घटक असणाऱ्या सामान्य मतदाराला मूळ विषयांपासून अंधारात ठेऊन तेच प्रताप पुन्हा करणार ते पाहावं लागणार आहे. हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा ‘तैमूरच्या’ डायपरमधल्या घडामोडींपेक्षा सत्ताधारांच्या आतल्या घडामोडींवर प्रसार माध्यमं लोकांमध्ये खरी जणजागृती निर्माण करून, त्यांना योग्य निर्णय घेण्यास भाग पाडतील. तोपर्यंत भाजप आणि शिवसेनेमधील सर्व घडामोडींचा जुळून येणारा योगागोग पाहून, केवळ पाडगावकरांच्या कवितेतील ती एक ओळ गुणगुणायची आणि गप्प बसायचं ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ही सेम असतं’.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट