30 April 2025 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची आज ३४ वी पुण्यतिथी

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह देशातील अनेक मान्यवरांनी इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच इंदिरा गांधींच्या दिल्लीयेथील समाधीस्थळी जाऊन राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. तसेच इंदिरा गांधींच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, “आजीने मला खूप काही शिकवलं आणि माझ्यावर खूप प्रेम केलं. तिने देशातील सामान्यांसाठी सुद्धा खूप काही केलं. मला तिचा सार्थ अभिमान आहे’ अशा शब्दात काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इंदिराजी देशाच्या एक सशक्त महिला पंतप्रधान म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या रोखठोक निर्णयांमुळे जगाला भारतापुढे नमते व्हावं लागलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् अत्यंत कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला होता. भारतानं त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करत अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार मिटविण्यासाठी सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात भारत एक आण्विक संपन्न देश म्हणून उदयास आला होता. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला देशातील विरोधकांनी नेहमीच प्रचंड विरोध केला हा इतिहास आहे. परंतु कोणालाही न जुमानता त्यांनी देशाहितासाठी कठोर निर्णय घेतले आणि त्यामुळेच त्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या