17 November 2019 9:48 PM
अँप डाउनलोड

#GoBackModi ट्विटरवर ट्रेंड; 'गो बॅक मोदी', तामिळनाडू दौऱ्याला विरोध

मदुराई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुतील मदुराईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानिमित्त संपूर्ण तामिनाडूत ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड करत त्यांना जोरदार विरोध केला जातो आहे. त्यानिमित्त लाखो तमिळ नेटीझन्स आक्रमक झाले असून ट्विटवर मोदींविरोधात रान पेटवण्यात आले आहे.

तामिळनाडूतील स्थानिकांचा मोदींच्या दौऱ्याला प्रचंड विरोध असल्याचे समजते. तसेच त्यात स्थानिक नागरिकांसोबत विरोधी पक्षातील नेते आणि डाव्या पक्षांचा सुद्धा समावेश असल्याचे समजते. ट्विटरवर मागील १२ तासांपासून #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे. थुटुकुंडी येथील पोलिसांचा गोळीबार, गाजा रिलिफ फंड याबाबत मोदींना खूप प्रश्न विचारून घेरण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी या ट्रेंडला सुरुवात झाली असून रविवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत तब्बल २.५० लाख ट्विपल्सने संबंधित हॅशटॅगने नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1038)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या