मोदी सरकार सत्तेत….पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
सीबीआय अधिकारीच एकमेकांवरील आरोपांवरून भ्रष्टचाराच्या जाळ्यात? दुसरीकडे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा तर मोदी सरकारविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे देशात सध्या सीबीआय सारख्या महत्वाच्या विभागातील घडामोडीमुळे राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालं आहे. काँग्रेस आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी तर या घडामोडींचा थेट संबंध राफेल लढाऊ विमानांच्या डील संबंधित चौकशीसोबत जोडला आहे.
पण २०१३ मध्ये गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि सध्याच्या पंतप्रधानांनी CBI चा उल्लेख काँग्रेसच्या काळात काय केला होता ते पहा. मग आजच्या घडामोडीवरून देशाने काय अर्थ काढावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
