Punjab Congress crisis | काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनामा मागितला | पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत
चंदीगड, १८ सप्टेंबर | पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे फरमान काढले. यासोबतच, आज होणाऱ्या आमदार गटाच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. सद्यस्थितीला कॅप्टन समर्थकांनी हे वृत्त फेटाळून लावले. पण, या चर्चांमुळे नवज्योत सिंग सिद्धू गटाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Punjab Congress crisis, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनामा मागितला, पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत – Punjab Congress crisis Sonia Gandhi has spoken to Amarinder Singh :
पंजाबमध्ये कॅप्टन यांच्या विरोधात 40 आमदारांनी नाराजी व्यक्त करणारे एक पत्र काँग्रेसच्या अध्यक्षांना पाठवले. त्याचाच विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याच निमित्तीने चंदीगड येथे पंजाब काँग्रेस भवनात आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीची माहिती रावत यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर जारी केली. याच बैठकीनंतर अजय माकन आणि हरीश चौधरी यांना केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे राजकीय सल्लागार तसेच माजी DGP मोहंमद मुस्तफा यांचे ट्विट चर्चेत आहे. पंजाबच्या आमदारांकडे साडे चार वर्षांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री निवडण्याची संधी आहे. अर्थातच त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसचे नाहीत असा सूचक इशारा केला. मुस्तफा पुढे म्हणाले, की 2017 मध्ये पंजाबने काँग्रेसचे 80 आमदार निवडून दिले. तरीही काँग्रेसला आतापर्यंत सीएम लाभला नाही. त्यातही साडे 4 वर्षांत कॅप्टन यांना पंजाबवासियांचे दुख मनातून समजलेले नाहीत. काँग्रेसच्या 80 पैकी 79 (कॅप्टन यांना सोडून) आमदारांसाठी ही जल्लोष करण्याची संधी आहे अशी टीका त्यांनी केली.
सिद्धू यांनी देखील काँग्रेस आमदारांच्या बैठकीवर सोशल मीडिया पोस्ट केली. काँग्रेस सरचिटणीस आमदार परगट सिंग यांच्या मते अंतर्गत धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. यावर प्रत्येकाचा आप-आपला दृष्टीकोन असू शकतो.
Punjab Congress crisis Captain Amarinder asked to resign he threatens to quit party :
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद डोकेदुखी ठरणार?
नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसने पंजाब प्रदेशाध्यक्ष पद दिल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढले. त्यातही प्रामुख्याने कॅप्टन यांच्या विरोधातले आमदार एकत्रित येण्यास सुरुवात झाली. सिद्धू समर्थक त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच अंतर्गत मतभेद मिटवण्याचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न केला जात आहे.
कोण घेणार कॅप्टनची जागा?
* कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर खुर्ची सोडण्याची वेळ आल्यास पुढील मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेस बंडखोर आमदारांपैकी एक गट सुखजिंदर रंधावा यांना सीएम करू इच्छित आहे. पण, तसे झाल्यास कॅप्टन गट नाराज होऊ शकतो.
* यासोबतच सोशल मीडियावरून नवज्योत सिंग सिद्धू यांना सीएम करण्यासाठी कॅम्पेन चालवले जात आहेत. पण, त्यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतरच काँग्रेसमध्ये फुटीची परिस्थिती निर्माण झाली. अशात सिद्धूंना सीएम पद देऊन पक्ष धोका पत्करणार का? असा प्रश्न आहे.
* पंजाबमध्ये सध्या मुख्यमंत्री कॅप्टन आणि प्रदेशाध्यक्ष सिद्धू हेच शिख चेहरे आहेत. यामुळे, पंजाबमध्ये काँग्रेसला हिंदू आणि शिख मतांमध्ये ताळमेळ बसवणे कठीण जात आहे. पुढील 5 महिन्यांचा मुख्यमंत्री म्हणून सुनिल जाखड यांचेही नाव चर्चेत आहे.
* माजी प्रदेशाध्यक्ष लाल सिंग, खासदार प्रताप सिंह बाजवा, राजिंदर कौर भट्ट्ल हे देखील सीएम पदाच्या शर्यतीत आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Punjab Congress crisis Sonia Gandhi has spoken to Amarinder Singh.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News