16 April 2024 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 16 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Man Infra Share Price | शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांना दिला 1900% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा? Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 593 टक्के परतावा, शेअरमध्ये पुढे तेजी येणार? HCC Share Price | शेअरची किंमत 36 रुपये! कंपनीबाबत आली सकारात्मक अपडेट, शेअर्सला किती फायदा होणार?
x

'मोदीजी, भारताच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो': राहुल गांधींचा बोचरा प्रश्न

नवी दिल्ली : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप करताना काँग्रेसवाले महिलांचा अपमान करतात अशी टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींना प्रश्न विचारून त्यांना चांगलच कोंडीत पकडलं आहे.

‘मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान आपल्या घरापासून सुरू होतो,’ असं म्हणत काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींना सणसणीत टोला हाणला आहे. काँग्रेस महिलांचा अपमान करत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी काँग्रेसवर केली होती. त्याला राहुल गांधींनी ट्विटरवरून उत्तर देत मोदींना चांगलेच तोंडघशी पाडले आहे.

त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘मोदीजी! तुमचा संपूर्ण आदर ठेवत सांगतो, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान हा आपल्या घरातून सुरू होतो. विषय भरकटवू नका. केवळ माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या…जेव्हा तुम्ही मूळ राफेल लढाऊ विमानांच्या करारात बदल केला, तेव्हा वायूसेना आणि संरक्षण मंत्रालयाने आक्षेप नोंदवला होता का? हो की नाही?’ असा सवाल करत राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला आहे. समाज माध्यमांवर या ट्विटला भरपूर लाईक्स मिळत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x