28 March 2024 8:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Shivsena Dasara Melava 2021 | भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा उद्धव ठाकरेंचा घणाघात

Shivsena Dasara Melava 2021

मुंबई, १५ ऑक्टोबर | आज विजयादशमीचा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठे महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडला आहे. नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका आहे’, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला (Shivsena Dasara Melava 2021) चढवला आहे.

Shivsena Dasara Melava 2021. Today, Vijayadashami is being celebrated with great enthusiasm. Dussehra is also of great political importance in Maharashtra. Today, Shivsena’s Dussehra festival has also passed. There is a threat to Hindutva from neo-Hindutva , he has launched a verbal attack on the opposition :

ठाकरे कुटुंबियांवर टीका करणे हे अनेकांच्या रोजगार हमीचा धंदा झाला आहे. पण ठाकरे कुटुंबियांना कोणी जन्माला आलेला नाही. अंगावर कोणी आलं तर तिथेच ठेचू, तुम्हीही कितीही चिरका पण माझा वाडा चिरेबंद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुले उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हावला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असे कधीच वाटू नये. माझे तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असे कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असे वाटो, अशी इश्वरचरणी प्रार्थना आहे.

कारण काही जणांना असे वाटते जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदे आणि सत्ता काय आहेत? पदे येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.

मी तुमच्याशी बोलतोय. माझ्या जनता-जनार्दनाशी बोलतो आहे. माता भगिणींसाठी बोलतो आहे. पण एक विकृती हल्ली आलेली आहे. मला हल्ली असे वाटायला लागले आहे, हे जे चिरकणे आहे, मग ठाकरे कुटुंबियांवर हल्ले, हल्ले म्हणजे असा कुणी मायेचा पुत्र जन्माला आलेला नाही जो ठाकरेंवर हल्ला करेल, तिथल्या तिथे ठेचून टाकू त्याला. अशीही घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महापालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकले:
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. स्वातंत्र्य लढ्यातील पश्चिम बंगालच्या योगदानाचे दाखले देत उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिकेसाठी ‘बंगाल पॅटर्न’ राबवण्याची हाक दिलीय. भाजपमुळेच हिंदुत्व धोक्यात असल्याचा इशारासुद्धा त्यांनी दिलाय.

आपलं सरकार फोडण्याचे-पाडण्याचे अनेक प्रयत्न केले:
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. ते फोडण्याचे-पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. मी तर आजसुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा. पण तसं करून पडत नाही. आपल्याकडे एक खेळ आहे, छापा की काटा, छापा टाकला की काटा काढायचा. हे जास्त थेरं चालू शकत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Shivsena Dasara Melava 2021 CM Uddhav Thackeray criticized BJP over Hindutva issue.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x