19 April 2024 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

धक्कादायक! केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना वाटलेल्या टॅबलेटमध्ये प्रिलोडेड अश्लील फोटो: ANI

रांची : छत्तीसगडमधील शहरांबरोबरच ग्रामीण भागातील सरकारी शाळांना केंद्र सरकारने वाटलेल्या टॅबलेटमध्ये अश्लील फोटो प्रिलोडेड असल्याच उघड झालं आहे. केंद्र सरकारकडून सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांच्या हजेरीचा तसेच दैनंदिन कामाचा तपशील ठेवण्याच्या उद्देशाने हे टॅबलेट वाटण्यात आले होते. परंतु त्यातील ही धक्कादायक गोष्ट उघड झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

केंद्राने दिलेले हे टॅबलेट सुरु करताच सर्वप्रथम अश्लील फोटो दिसत असल्याचे निदर्शनास आले असून, लहान मुलं आणि मुलींना याबद्दल बोलताना सुद्धा अवघड जात आहे असं शाळांचं म्हणणं आहे. छत्तीसगड क्षेत्राचे क्लस्टर रिसोर्स कॉर्डिनेटर असलेल्या गौरांग मिश्रा यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला या संबधित प्रकाराची माहिती पुरवली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. या समस्येवर निदान शोधण्यासाठी शाळांना ते टॅबलेट ऑफलाइन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोदी सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या वर्षाच छत्तीसगडमधील सरकारी शाळांमध्ये या टॅबलेटचे वाटप केल होत. या टॅबलेटची किंमत १०,००० रुपये इतकी होती. मोदी सरकारने हे टॅबलेट विद्यार्थ्यांना वाटले खरे परंतु ते देण्यापूर्वी कोणतीही शहानिशा सरकारकडून करण्यात आली नाही असं विरोधक टीका करतांना म्हणत आहेत. सरकार देशातील शिक्षण व्येवस्थेच्या बाबतीत किती उदासीन आहे हेच या उदाहरणावरून बोलता येईल अशी प्रतिक्रिया सर्वच थरातून येत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x