15 August 2022 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नाही | मला कोणाला घाबरायची गरज नाही - आमदार मंदा म्हात्रे

MLA Manda Mhatre

नवी मुंबई, ०४ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जात असल्याचा आरोप यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला आहे.

भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नाही, मला कोणाला घाबरायची गरज नाही – Women do not get respect in BJP said BJP MLA Manda Mhatre :

२०१९ च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असं देखील यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या. त्याचप्रमाणे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आल्याचा दावा देखील मंदा म्हात्रे यांनी केला आहे.

दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतर, कर्तृत्त्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासमोर आपल्या पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मंदा म्हात्रे यावेळी म्हणाल्या, “महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर तर मोदींची लाट नव्हती ना? महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात.”

मंदा म्हात्रे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या कि, “मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी स्पष्टच बोलते. मी लढणार म्हणजे लढणार.” राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Women do not get respect in BJP said BJP MLA Manda Mhatre.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x