29 March 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Zilla Parishad Election Results 2021 | जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 23 तर काँग्रेस-राष्ट्रवादीला १७-१७

Zilla Parishad Election Results 2021

मुंबई, ०६ ऑक्टोबर | राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला (Zilla Parishad Election Results 2021) आहे. तर पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेल्याचं पाहायला मिळत आहे.

Zilla Parishad Election Results 2021. The BJP has once again established its dominance in the elections for 85 seats in six Zilla Parishads. The BJP has won the highest number of 23 seats in this election. The Congress and the NCP have got equal seats :

पंचायत समिती पोटनिवडणूक (144 जागा)
भाजप – 33
शिवसेना – 22
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
काँग्रेस – 35
इतर – 38

मतदारांनी काँग्रेसला साथ दिली – पटोले
सहा जिल्ह्यातील जनतेचे आभार आम्ही या जिल्हा परिषद, पंचायत समितीनिमित्त एक सुरुवात केली आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक मागे पडलो. तिथेही काही दिवसांत आम्ही काम करु. खरं तर आज भाजप देशातील वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, संविधान विरोधी धोरण या सगळ्याला कांग्रेसच थांबवू शकतं हे लोकांनी मान्य केलंय. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे, असं पटोले म्हणाले.

लोकशाहीत जनता मोठी आहे. जनतेचा विश्वास सर्वात मोठा असतो. आमच्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करुन आम्ही जनतेसमोर जाऊ, असं मी म्हटलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. आज देश बरबाद होतोय. त्याविरोधात काँग्रेस लढत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आमच्यापेक्षा पुढे आहे. मात्र पंचायत समितीत आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, असं पटोले म्हणाले.

तर सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फारशी चमक दाखविण्यात आलेली नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Zilla Parishad Election Results 2021 BJP became highest party in bypoll.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x